टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात , केन आणि टेलरची जोडी मैदानात

पहिल्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीचा खेळही रद्द करण्यात आला होता. तसेच आज सकाळपासून वातावरण ढगाळ दिसत आहे. परंतु आता पाचव्या दिवशीच्या सामन्याला सुरूवात झाली असून केन आणि टेलरची जोडी मैदानात उतरली आहे. 

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला (WTC Final 2021) आज पाच दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु पहिल्या दिवसापासून खेळावर पावसाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे एकही दिवशीचा खेळ संपूर्ण होऊ शकला नाही. पहिल्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीचा खेळही रद्द करण्यात आला होता. तसेच आज सकाळपासून वातावरण ढगाळ दिसत आहे. परंतु आता पाचव्या दिवशीच्या सामन्याला सुरूवात झाली असून केन आणि टेलरची जोडी मैदानात उतरली आहे.

    न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव २१७  धावांमध्ये आटोपला. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्याने न्यूझीलंडच्या संघाने संयमी खेळ करत २ बाद १०१ धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली.

    कॉन्वे याने अर्धशतकही झळकावलं. पण लेथमला शमीने आणि कॉन्वेला इशांत शर्माने बाद करत भारताला दोन विकेट मिळवून दिल्या. त्यानंतर काही वेळातच सामना दिवसभराचा खेळ आटोपून थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवसाखेरीस न्यूझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद होती. त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यानंतर पाचव्या दिवशीचा खेळ चार वाजता सुरु केला गेला आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ५७व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीला चौकार ठोकत दिवसाचा पहिला चौका न्यूझीलंडला मिळवून दिला आहे.