
क्रिकेटचा आयकॉन सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जगभरात अनेक ठिकाणी दमदार कामगिरी करत क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं आहे. यामुळे वानखेडे स्टेडियममधील सचिन तेंडुलकरच्या पुतळा उभारला जात आहे.
मुंबई : क्रिकेटचा आयकॉन सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जगभरात अनेक ठिकाणी दमदार कामगिरी करत क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं आहे. यामुळे वानखेडे स्टेडियममधील सचिन तेंडुलकरच्या पुतळा उभारला जात आहे. या पुतळ्याचे अनावरण भारत-श्रीलंका विश्वचषक लढतीपूर्वीच होणार असल्याचे सांगितले जात आहे.
On November 1, Wankhede Stadium will witness the unveiling of a life-size statue dedicated to cricket legend Sachin Tendulkar. The Mumbai Cricket Association is giving this tribute, as the legend turned 50 this year.#sachintendulkar #wankhedestadium #CricketTwitter pic.twitter.com/CeDYrfs15y
— We Miss You SACHIN (@WeMissYouSachin) October 31, 2023
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक सामन्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी क्रिकेटचा महान दिग्गज सचिन तेंडुलकरचा सन्मान करणाऱ्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, एप्रिलमध्ये ५० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सचिनचा पुतळा बसवण्याची योजना समोर आली होती.
#WATCH | Maharashtra | Painter-sculptor from Ahmednagar, Pramod Kamble has been working on the statue of Cricket legend Sachin Tendulkar. The statue will be installed by the Mumbai Cricket Association (MCA) at Wankhede Stadium on November 1, as a tribute to Tendulkar who turned… pic.twitter.com/TkvXDbxpSe
— ANI (@ANI) October 22, 2023
या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे सचिव जय शहा, खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली जात आहे.