जपान सरकारच्या कठोर तरतुदी; भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंसाठी कडक नियम

जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी जपान सरकारने कठोर तरतुदी जारी केल्या आहेत. जपान सरकारच्या म्हणण्यानुसार, या खेळाडू आणि अधिकाऱ्यांना येथे जाण्यापूर्वी आठवडाभर दररोज कोरोना चाचणी घ्यावी लागणार आहे. आणि जपानमध्ये पोहोचल्यानंतर तीन दिवस इतर कोणत्याही देशातील खेळाडूंना तसेच स्थानिक लोकांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.

    दिल्ली : जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी जपान सरकारने कठोर तरतुदी जारी केल्या आहेत. जपान सरकारच्या म्हणण्यानुसार, या खेळाडू आणि अधिकाऱ्यांना येथे जाण्यापूर्वी आठवडाभर दररोज कोरोना चाचणी घ्यावी लागणार आहे. आणि जपानमध्ये पोहोचल्यानंतर तीन दिवस इतर कोणत्याही देशातील खेळाडूंना तसेच स्थानिक लोकांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.

    आता भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) या तरतुदींवर कडक प्रतिक्रिया दिली आहे. टोकियोला आगमन झाल्यानंतर 14 दिवसांसाठी कोरोनाचे विविध प्रकार सापडलेल्या भारतासह 11 देशांमधून जपानला जाणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी तसेच प्रवासी यांच्यावर जपान सरकारने कडक सूचना दिल्या आहेत.

    भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) याला एक अन्यायकारक आणि भेदभाव करणारे नियम म्हटले आहे. आयओएच्या मते, भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. काही आठवड्यांपूर्वी पर्यंत, दररोज 3 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदविली जात होती, जी आता 60 हजारांवर आली आहेत. दरम्यान वेटलिफ्टर मीराबाई चानू, कुस्तीपटू विनेश फोगट आणि भाला फेकणारा नीरज चोपडा हे परदेशात प्रशिक्षण घेत आहेत आणि तेथून ते टोकियो येथे पोचतील. त्यामुळे त्यांच्यावर सदर नियम लागू नसतील.