मुंबई इंडियन्सची दमदार सुरुवात, पॉवरप्लेपर्यंत धावसंख्या ५० च्या पुढे; रोहित-ईशान क्रीजवर

आयपीएलमध्ये आज डबल हेडर डे आहे. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे.

  मुंबई : आयपीएलमध्ये आज डबल हेडर डे आहे. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. जिथे डीसीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. MI ने ६ षटकात एकही विकेट न गमावता ५३ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा ३० आणि इशान किशन २२ धावांवर क्रीझवर उपस्थित आहेत.
  सामन्याबद्दल मनोरंजक तथ्ये

  रोवमन पॉवेल, मनदीप सिंग, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव आणि कमलेश नागरकोटी दिल्लीकडून पदार्पण करत आहेत.

  मुंबई इंडियन्सचा टीम डेव्हिड आयपीएलमध्ये पहिला सामना खेळत आहे. आयपीएल खेळणारा तो सिंगापूरचा पहिला खेळाडू आहे.

  ब्रेबॉर्न स्टेडियमवर आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान ६ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

  दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:

  DC: पृथ्वी शॉ, टिम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (w/c), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी.

  MI: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी.