पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरची सुवर्णकामगिरी, भारताची पदक संख्या २० वर

  राष्ट्रकुल स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022)सातव्या दिवशी भारतीय खेळाडूच्या दमदार कामगिरीमुळे भारताच्या खात्यात अजून एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये (para powerlifting) भारताचा पॉवरलिफ्टर सुधीर (Sudhir) याने पुरुषांच्या हेवीवेटमध्ये १३४. ५ गुण प्राप्त करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

  सुधीर आणि लांब उडीपटू श्रीशंकर याच्या विजयानंतर सातव्या दिवशी भारताची पदक संख्या २० वर पोहोचली असून राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या सातव्या क्रमांकावर आहे. पुरूष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरनं एकतर्फी प्रदर्शन केले असून तो स्पर्धेत सुरुवातीपासून इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे होता. त्याने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो ग्राम वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले. सुधीरचे वजन हे ८७. ३० इतके आहे. ज्यामुळे त्याला स्पर्धेत १३४. ५ गुण मिळाले असून या गुणांसह त्यानं नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.

  सध्या सर्वस्थरातून सुधीरने केलेल्या कामगिरीचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी देखील सुधीरला शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले आहे.

  भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-

  सुवर्णपदक- ६ (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर)

  रौप्यपदक- ७ (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)

  कांस्यपदक- ७ (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर.)