आयपीएलमधील निवृत्तीनंतरही सुरेश रैना घेणार ऑक्शनमध्ये भाग; चेन्नईसाठी ‘ही’ भूमिका पारपडणार

    मुंबई : इंडियन प्रिमीयर लीग (IPL) म्हणजेच आयपीएलच्या १६ व्या मोसमासाठी आज २३ डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन पारपडणार आहे. या मिनी ऑक्शनमध्ये भारतातील काही स्टार खेळाडूंसह काही स्टार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड देशांचे बरेच दिग्गज खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चढाओढ दिसणार असून या ऑक्शननंतर बहुतेक संघांमध्ये मोठे बदल होताना पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैनाही या मिनी ऑक्शनमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

    भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाने (Suresh Raina) काही महिन्यांपूर्वीच आयपीएल मधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र निवृत्तीनंतर देखील रैना चेन्नई संघासोबत या ऑक्शनमध्ये पहायला मिळणार आहे. मॉक ऑक्शनमध्ये देखील रैना सीएसकेला दर्शवणारा पिवळा टी-शर्ट घालून आला होता आणि याद्वारे त्याने आपण चेन्नईच्या दिशेने राहणार असल्याचे दाखवले होते. या लिलावात रैनाने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला चेन्नईत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि खेळाडूला तब्बल 19.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले. रैनाने मॉक ऑक्शनमध्ये जे काही केले त्यातून दिसून येतं की खऱ्या लिलावातही चेन्नई करनला मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करू शकते. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रैनाने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये भाग घेतला. यानंतर तो अबू धाबी टी10 लीगमध्येही सहभागी झाला आहे. काही परदेशी टी-20 लीगमध्येही तो खेळताना दिसतो.

    कुठे पाहाल ऑक्शन?

    यंदा केरळमधील कोची शहरात ठेवण्यात आला आहे. लिलाव प्रक्रिया आज अर्थात 23 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होईल या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाईल. तसेत लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल.