क्रिकेटपटू सुरेश रैनावर कोसळला दुःखाचा डोंगर! ‘या’ व्यक्तीचे झाले निधन

    भारतीय क्रिकेट विश्वात मोलाचे योगदान देणारा क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्या बालपणीचे प्रशिक्षक सतपाल कृष्णन यांचे नुकतेच निधन झाले आहे. रैनाने ट्विट करून याबाबतची माहीती दिली. त्याने सांगितले, ‘माझे प्रशिक्षक कृष्णन सर यांच्या निधनाची बातमी ऐकून मन दुखावले आहे. माझ्या सर्व यश आणि परिश्रमामागे त्यांचा हात होता. त्यांनी मला शिकवलेला धडा कधीच विसरता येणार नाही. ते नेहमी माझ्या आठवणींमध्ये आणि प्रार्थनांमध्ये असतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांबद्दल माझ्या मनापासून संवेदना’.

    सुरेश रैना याचे प्रशिक्षक सतपाल कृष्णन हे मागील अनेक काळापासून आजारी होते. जालंधर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते, मात्र अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.

    रैनाच्या आत्मचरित्रात ‘सतपाल’ यांचा उल्लेख :
    सुरेश रैनाने आपल्या ‘बिलीव्ह’ या आत्मचरित्रात सतपाल कृष्णन यांचाही उल्लेख केला आहे. लहानपणी सतपाल कृष्णन यांनी त्याला क्रिकेटमधील बारकावे समजून घेण्यात खूप मदत केली होती. सुरेश रैनाने शालेय जीवनात उत्तर प्रदेशातील गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता जिथे त्याने इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेतले होते. यादरम्यान सतपाल यांनी रैनाला प्रशिक्षण दिले होते.