उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळताच सूर्यकुमार भावुक! म्हणाला, “हे अपेक्षित नव्हते…”

2023 वर्षाची सुरुवात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेतने होणार असून ही मालिक भारतात खेळवला जाणार आहे. श्रीलंके विरुद्ध भारत मालिकेची सुरुवात 3 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे.

    भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये झालेल्या सर्वच स्पर्धांमध्ये भारतासाठी मोलाची कामगिरी केली. याकामगिरीसह सूर्या आयसीसी क्रमवारीत जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवला भारतीय संघाचा उपकर्णधार पॅड देण्यात आले आहे.सूर्यकुमार यांच्यावर प्रथमच अशी जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे कधीकाळी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या सूर्यकुमारला याच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे तो अतिशय भावुक झाला.

    रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टी-20 संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार आणि सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. सूर्या सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. या सामन्यानंतर तो म्हणाला, “हे उपकर्णधारपद अपेक्षित नव्हते. मी एवढेच सांगू शकतो की, या वर्षी मी ज्या प्रकारे खेळलो त्याबद्दल हे माझ्यासाठी एक प्रकारचे बक्षीस आहे. ते चांगले वाटते आणि मी खरोखर पाहत आहे.

    अतिरिक्त जबाबदारी त्याच्यावर दडपण आणेल का असे विचारले असता सूर्या म्हणाला की, “माझ्यावर नेहमीच जबाबदारी आणि दबाव असतो. मी नेहमी माझ्या खेळाचा आनंद घेतो आणि कोणतेही अतिरिक्त ओझे घेत नाही. मला संघाचा विचार करायचा आहे. हॉटेल आणि नेटवर जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा मी माझ्या खेळाचा आनंद घेण्यासाठी तिथे जातो. 2023 वर्षाची सुरुवात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेतने होणार असून ही मालिक भारतात खेळवला जाणार आहे. श्रीलंके विरुद्ध भारत मालिकेची सुरुवात 3 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे.