सूर्यकुमार यादवने जिंकलं चाहत्याचं मन

    भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये सध्या टी २० मालिका खेळवली जात आहे. या सामन्यांमध्ये सध्या भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. या टी २० मालिकेतील अंतिम दोन सामने अमेरिकेत खेळवले जाणार असून त्या करता भारतीय संघ अमेरिकेत दाखल होत आहे. मात्र बुधवारी संपन्न झालेल्या टी २० च्या तिसऱ्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने असे काही केले ज्याने त्याच्या चाहत्यांसह इतर क्रिकेट प्रेमींचीही त्याने मने जिंकली आहेत. या प्रसंगाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत बीसीसीआयने देखील सूर्यकुमारचे कौतुक केले आहे.

    भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने मंगळवारी सेंट कीट्समधील वॉर्नर पार्क येथे वेस्ट इंडिज सोबतच्या तिसऱ्या टी २० सामन्यात ७३ धावा केल्या. त्याने वादळी खेळी करत मन ऑफ द मॅचचा देखील किताब पटकावला. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार हा आपल्या चाहत्यांच्या गोतावळ्यात हरवून गेला होता. त्याने चाहत्यांसोबत हस्तांदोलन, सेल्फी, फोटो, ऑटोग्राफ देत काहीसा वेळ घालवला. टी २० मध्ये सूर्यकुमारने आतापर्यंत २० षटकात ५ अर्धशतक आणि १ शतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवचा आपल्या चाहत्यांसोबतचा हा विडीओ बीसीसीआयने शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे.