३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा! टेबल टेनिसमधील दोन्ही गटात महाराष्ट्राची विजयी सलामी

या स्पर्धेतील सांघिक लढतींना येथील आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम मध्ये प्रारंभ झाला. शेट्टी याने एकेरीच्या पहिल्या लढतीत उत्तर प्रदेशच्या दिव्येश श्रीवास्तव याला ११-९,११-५,७-११,११-९ असे पराभूत केले पाठोपाठ सिद्धेश पांडे याने अभिषेक यादव याच्यावर ७-११, ११-७,४-११,११-४,११-८ असा रोमहर्षक विजय नोंदविला आणि महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

    सूरत : टेबल टेनिसमध्ये (Table Tennis) सानील शेट्टी (Sanil Shetty) याच्या दुहेरी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने पुरुषांच्या (Maharshtra team) गटात उत्तर प्रदेशला ३-१ असे हरवले. महिलांमध्ये महाराष्ट्राने (Women team) गुजरातचा (Gujrat) ३-० असा दणदणीत पराभव केला. पाठोपाठ त्यांनी तेलंगणाला ३-० असे नमविले. या स्पर्धेतील सांघिक लढतींना येथील आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम मध्ये प्रारंभ झाला. शेट्टी याने एकेरीच्या पहिल्या लढतीत उत्तर प्रदेशच्या दिव्येश श्रीवास्तव याला ११-९,११-५,७-११,११-९ असे पराभूत केले पाठोपाठ सिद्धेश पांडे याने अभिषेक यादव याच्यावर ७-११, ११-७,४-११,११-४,११-८ असा रोमहर्षक विजय नोंदविला आणि महाराष्ट्राला २-० अशी आघाडी मिळवून दिली. (Maharashtra both team win)

    तथापि दीपित पाटील या महाराष्ट्राच्या खेळाडूला उत्तर प्रदेशच्या सार्थ मिश्रा याने ११-४,११-८,६-११,६-११,११-९ असे पराभूत करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. शेट्टी याने पुन्हा टॉप स्पीन व काउंटर ॲटॅक असा खेळ करीत उत्तर प्रदेश या अभिषेक यादव याचा ११-४,११-९,९-११,११-६ असा पराभव केला त्यामुळे महाराष्ट्राला ही लढत ३-१ अशी जिंकता आली.

    महिलांमध्ये महाराष्ट्राला विजय मिळवताना फारशी अडचण आली नाही. जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या दिया चितळे हिने महाराष्ट्राला पहिली लढत जिंकून दिली. तिने फ्रेनाझ चिपिया हिचा ११-९,११-६,१२-१० असा पराभव केला. पाठोपाठ स्वस्तिका घोष हिने कृतिका सिन्हा रॉय याच्यावर ११-४, १०-१२, ११-४, ७-११,११-९ अशी मात केली आणि महाराष्ट्राला २-० असे आघाडीवर नेले. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या रीथ रीशा टेनिसन हिने फिलझा फातिमा कादरी हिला ११-९,११-७,७-११,११-४ असे हरवीत महाराष्ट्राला ३-० असा सफाईदार विजय मिळवून दिला.