
एका टप्प्यावर संघाने 15 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत मायकेल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्सने डाव पुढे नेला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर सँटनर आणि फिलिप्स यांनी सातव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली.
रायपूर – वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 109 धावांचे लहान लक्ष्य दिले आहे. रायपूरमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाला 34.3 षटकात केवळ 108 धावा करता आल्या.
शेवटची विकेट म्हणून ब्लेअर टेकनर बाद झाला. कुलदीपने त्याला एलबीडब्ल्यू केले. याआधी ग्लेन फिलिप्स (36 धावा), मिचेल सँटनर (27 धावा) आणि मायकेल ब्रेसवेल (22 धावा) यांनी धावांचे योगदान दिले. बाकीचे फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. संघाच्या टॉप-5 फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. एकूण 8 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत.
एका टप्प्यावर संघाने 15 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत मायकेल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्सने डाव पुढे नेला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर सँटनर आणि फिलिप्स यांनी सातव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. भारताकडून मोहम्मद शमीने तीन बळी घेतले. तर हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2-2 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.