टीम India and Pakistan सामन्यावर धक्कादायक भविष्यवाणी, ‘ही’ टीम जिंकणार उद्याचा महामुकाबला

ICC च्या टुर्नामेंटमध्येच हे दोन्ही देश आमने सामने येतात. त्यामुळे उद्या कोण जिंकणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर आत्तापर्यंत कधीही पाकिस्तानची टीम, टीम इंडियाचा पराभव करु शकलेली नाही.

  मुंबई : टी-२० वर्ल्ड कप (T-20 world cup) मध्ये सर्वात मोठा सामना उद्या म्हणजे रविवारी होणार आहे. यात सख्खे शेजारी, पक्के वैरी म्हणजेच भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) आमने सामने येणार आहेत. या सामन्याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे. दोन्ही देशांचे परस्परांशी संबंध चांगले नसल्याने, यांच्यात सामने होत नाहीत.

  ICC च्या टुर्नामेंटमध्येच हे दोन्ही देश आमने सामने येतात. त्यामुळे उद्या कोण जिंकणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर आत्तापर्यंत कधीही पाकिस्तानची टीम, टीम इंडियाचा पराभव करु शकलेली नाही. या सामन्यात काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, त्यातच एका भविष्यावाणीने उद्याचा सामना कोण जिंकणार हे सांगितले आहे.

  ही टीम जिंकणार युद्ध

  पाकिस्तानचा माजी कॅप्टन युनूस खान याने सांगितले आहे की पाकिस्तान टी २० वर्ल्ड कपच्या सामन्यात भारताचा पराभव करुन ५-१ चा नवा रेकॉर्ड नोंदवेल. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यामध्ये क्रिकेटर्सवर मोठा दबाव असतो, आणि जी टीम हा दबाव सहन करु शकते, तीच उत्तम कामगिरी करु शकेल. आता उद्या मैदानात कोणती टीम हा दबाव पेलू शकेल, ते आपल्याला पाहयाला मिळेलच.

  पाकिस्तानच जिंकेल – युनूस खान

  या सान्यात टीम पाकिस्तानच जिंकेल असा विश्वास माजी कॅप्टल युनूस खानने व्यक्त केला आहे. २००९ च्या टी-२० वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये युनूसने पाकिस्तानची कॅप्टन्सी सांभाळली होती. ड्रेसिंग रुममध्ये महेंद्रसिंग धोनी याची उपस्थिती, टीम इंडियासाठी प्लस पाँईट असेल, असेही त्याने सांगितले आहे. मोठा दबाव असलेल्या या सामन्यामध्ये मार्गदर्शक म्हणून धोनी मोठी भूमिका निभावण्याची शक्यताही युनूस खानने व्यक्त केली आहे. धोनीकडे वातावरण सहज ठेवण्याची आणि दबावातील मॅचेस जिंकण्याचा मोठा अनुभव असल्याचेही युनूसचे म्हणणे आहे.

  विराट कोहलीचेही केले कौतुक

  पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. दबावातील सामन्यामध्ये कसे खेळायला हवे, हे विराटला माहित असल्याचे मोहम्मद आमीरने म्हटले आहे. विराट हा महान खेळाडू आहे आणि तो चांगली कामगिरी करेल, असेही आमीर म्हणाला आहे.

  आत्तापर्यंत टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये पाच वेळा सामने झाले आहेत. यातला एकही सामना पाकिस्तानला जिंकता आलेला नाही. उद्या सुमारे दोन वर्षांनंतर दोन्ही टीम आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे.