न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा

या सामन्यामध्ये भारताकडून कोणत्या ११ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. अखेर BCCI नं टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

    शुक्रवार १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारताकडून कोणत्या ११ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल, याविषयी बरीच चर्चा सुरू होती. अखेर BCCI नं टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

    यामध्ये अपेक्षेप्रमाणे रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला असून मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना उद्यापासून सुरु होत असून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाउल मैदानात हा सामना रंगणार आहे.

    बीसीसीआयनं जाहीर केलेली भारताची प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे:

    विराट कोहली (कर्णधार), अजिंक रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी