
टीम इंडिया वर्ल्ड कपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना 8 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. सामन्याचे आयोजन हे चेन्नईत करण्यात आले आहे. दरम्यान, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. १५ जणांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई : क्रिकेट विश्वातून एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. आशिया कप 2023 (Asia Cup) नंतर आता आयसीसी वर्ल्ड कपला (World Cup) मोजून एक महिना बाकी आहे. पुढील महिन्यात क्रिकेटचा महासंग्राम अर्थ क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना 8 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. सामन्याचे आयोजन हे चेन्नईत करण्यात आले आहे. दरम्यान, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. १५ जणांची निवड करण्यात आली आहे. (Team India announced for World Cup; Among the 15 people, who has a chance, who rests? Read more)
Here’s the #TeamIndia squad for the ICC Men’s Cricket World Cup 2023 🙌#CWC23 pic.twitter.com/EX7Njg2Tcv
— BCCI (@BCCI) September 5, 2023
वर्ल्ड कपसाठी टीममध्ये 15 खेळाडूंचीच निवड
दरम्यान, श्रीलंकेत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगरकर आणि रोहित या दोघांची पत्रकार परिषद घेतली. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार असणार आहे. दुसरीकडे तिलक वर्मा, संजू सॅमसन, ऋतूराज गायकवाड आदींना संघात स्थान मिळवता आलेलं नाही.
संजू-तिलक वर्माला स्थान नाही
विश्वचषकाच्या अंतिम 15 खेळाडूमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांना संधी मिळाली नाही. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही स्थान मिळवण्यात यश आले नाही. भारताच्या 15 जणांच्या चमूमध्ये एकही ऑफ स्पिनर गोलंदाजाला स्थान दिले नाही.
वर्ल्ड कपसाठी अशी असेल टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशांत किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.