इंग्लंडकडून टीम इंडियाचा धुव्वा, मालिकेत साधली १-१ अशी बरोबरी

इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला असून इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. जॉनी बेअरस्टोची शतकी अन् जेसन रॉयची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने भारताचा ६ गडी व ३९ चेंडू राखून धुव्वा उडवला.

    पुणे : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात काल दुसरा एकदिवसीय सामना सुरू होता. परंतु यामध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला असून इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. जॉनी बेअरस्टोची शतकी अन् जेसन रॉयची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने भारताचा ६ गडी व ३९ चेंडू राखून धुव्वा उडवला.

    या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. १२४ धावांची खेळी साकारणाऱ्या जॉनी बेअरस्टोची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. आता तिसरा व अखेरचा सामना रविवारी पुण्यातच रंगणार आहे.

    भारताकडून मिळालेल्या ३३७ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी करताना विजयाची भक्कम पायाभरणी केली. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या जोडीने ११० धावांची भागीदारी रचली. तर रोहित शर्माच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे जेसन रॉय ५५ धावांवर धावचीत झाला.