झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेआधीच टीम इंडियाचा खेळाडू जाणार संघाबाहेर?

    १८ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध झिम्बाबवे या तीन दिवसीय क्रिकेट मालिकेकडे सर्वच क्रीडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र टीम इंडियाचा एक खेळाडू मालिकेआधीच संघाबाहेर जाण्याची शक्यता असून भारतीय संघाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

    वॉशिंग्टन सुंदरला अलीकडेच इंग्लंडमधील मँचेस्टर येथे लिस्ट ए सामन्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा झिम्बाब्वे दौरा संशयाच्या भोवऱ्यात आहे. झिम्बाबवे दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शनिवारी सकाळी झिम्बाब्वेला रवाना झाला असून आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण हे भूमिका बजावणार आहेत.

    लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लबने सुंदरच्या दुखापतीबद्दल ट्विट केले असून, क्षेत्ररक्षण करताना पडल्यामुळे डाव्या खांद्याच्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने मैदान सोडले. भारत १८, २० आणि २२ ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेमध्ये आयसीसी (ICC) सुपर लीगचा भाग म्हणून तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. झिम्बाब्वे अलीकडेच चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यांनी १० ऑगस्ट रोजी संपलेल्या वनडे आणि टी२० आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही मालिकेत बांगलादेशचा पराभव केला होता.