टीम इंडियातील खेळाडूंनी ही घेतला स्वातंत्र्योत्सवात सहभाग

  भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. अनेक जणांच्या त्याग आणि बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भारतीय उत्साहित आहेत. अशातच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनीही घरो घरी तिरंगा या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरी तिरंगा फडकावला आहे.

  स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी एक व्हिडिओ शेअर आपपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मिताली राजसह (Mithali Raj) अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर भारताच्या तिरंग्यासह फोटो पोस्ट केले आहेत.

  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला,
  स्वातंत्र्य दिनानिमित्त सचिननं आपल्या घरावर तिरंगा फडकवलाय. नुकताच सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्यात त्यानं म्हटलंय की, नेहमीच तिरंगा माझ्या हृदयात होता. आज मी माझ्या घरावरही तिरंगा फडकावणार आहे. माझ्या हृदयात तिरंगा, घरातही तिरंगा.” जय हिंद.”

  शिखर धनने व्यक्त केल्या भावना :
  धवननं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “स्वातंत्र्य दिन माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. देशाला स्वतंत्र करणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळेच आपला देश स्वतंत्र झाला आहे. यापुढंही देशाला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाऊया. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.”

  हार्दिक पांड्या:

  मिताली राज:

  जसप्रीत बुमराह: