टीम इंडियातून कट झाला ‘या’ भारतीय क्रिकेटरचा पत्ता, IPLचं करिअर पण धोक्यात..

भारताचा वेगवान फलंदाज मनीष पांडे (Manish Pandey) अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला खूप संधी देण्यात आली. परंतु यशाचा मार्ग (The Way Of Success) अद्यापही त्याच्यासाठी बंद झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) विरूद्ध खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात मनीष पांडेने केवळ 17 धावा काढल्या. त्यानंतर तो बाद (Out)  झाला.

    नवी दिल्ली: भारताचा एक खेळाडू मागील काही दिवसांपासून फ्लॉप शोमध्ये (Flop Show) चालत आहे. 31 व्या वयात क्रिकेटचं करिअर (Cricket Career)  संपवण्याच्या मार्गावर असताना दिसत आहे. भारताचा वेगवान फलंदाज मनीष पांडे (Manish Pandey) अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला खूप संधी देण्यात आली. परंतु यशाचा मार्ग (The Way Of Success) अद्यापही त्याच्यासाठी बंद झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) विरूद्ध खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात मनीष पांडेने केवळ 17 धावा काढल्या. त्यानंतर तो बाद (Out)  झाला.

    IPLचं करिअर पण धोक्यात…

    मिळालेल्या माहितीनुसार, मनीष पांडेचा भारतीय संघातून पत्ता कट झाला आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे आयपीएलचं करिअर सुद्धा धोक्यात असल्याचं दिसत आहे. श्रीलंका दौऱ्यावर असताना आपली ताकद दाखवण्यासाठी त्याच्याकडे उत्तम संधी होती. परंतु यामध्ये सुद्धा तो नापास झाला.

    आयपीएल 2021 मध्ये मनीष पांडेची ताकद सनरायझर्स हैदराबादच्या टीमसाठी कमी पडताना दिसत आहे. मनीष पांडेच्या खराब खेळीमुळे मधली फळीतील खेळाडूंचं खच्चीकरण होतं आहे. त्यामुळे टीमला मोठ्या प्रमाणात नुकसान पेलावं लागत आहे.