टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात, सलामीवर जोडी रोहित शर्मा-शिखर धवन मैदानात

इंग्लडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून सलामीवर जोडी रोहित शर्मा-शिखर धवन मैदानात उतरले आहेत.

    पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जात आहे. इंग्लडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून सलामीवर जोडी रोहित शर्मा-शिखर धवन मैदानात उतरले आहेत.

    दरम्यान, दुखापतीमुळे आज श्रेयस खेळू शकणार नाही. त्याच्या जागेवर आज रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. पुण्याच्या एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना पार पडत आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात ६६ धावांनी पराभूत करुन मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने १-० अशी विजयी सलामी नोंदवली आहे.