टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, अजिंक्य रहाणे १५ धावा करुन माघारी

दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होऊन काही वेळातच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाठोपाठ चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्यानंतर पंत आणि रहाणे मिळून खेळ सावरत असतानाच रहाणे १६ धावा करून बाद झाल्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.

    भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कोणता संघ विजयश्री खेचून आणणार आज हे स्पष्ट होणार आहे. पाचव्या दिवसाखेरीस भारतीय गोलंदाजांनी २४९ धावात किवींचा संघ गारद केल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताची अवस्था काहीशी बिकट झाली आहे. आतापर्यंत भारताने दुसऱ्या डावात २ बाद ६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताला ३२ धावांची आघाडी मिळाली आहे.

    मात्र दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होऊन काही वेळातच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाठोपाठ चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्यानंतर पंत आणि रहाणे मिळून खेळ सावरत असतानाच रहाणे १६ धावा करून बाद झाल्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या पाचव्या दिवसअखेर भारताने न्यूझीलंडसमोर ३२ धावांची आघाडी घेतली आहे. आज सामन्याच्या राखीव दिवशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता कोण असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला आहे.