आशियाई खेळांमध्ये पदकांचे सत्र सुरूच, पारुल चौधरीने मिळवले सुवर्ण तर भारताचा दिग्गज स्क्वॉशपटू सौरव घोषाल उपांत्य फेरीत

विथ्या रामराजने महिलांच्या ४०० मीटर हर्डल्स फायनलमध्ये कांस्यपदकासह अ‍ॅथलेटिक्स पदकाची सुरुवात केली. विथ्या रामराजने कांस्यपदकासह अ‍ॅथलेटिक्स पदकाची सलामी दिली.

    आशियाई क्रीडा २०२३ : भारताचा तेजस्वी शंकर मेन्स डेकॅथलॉन मध्ये स्लिव्हर पदक पटकावले आहे. डेकॅथलॉन स्पर्धेमध्ये खेळाडूला १० खेळांमध्ये परफॉर्म करावे लागते आणि ज्या प्रत्येक खेळाचे त्यांना गुण मिळतात. सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या खेळाडू विजयी घोषित केले जाते. भारताचा दिग्गज स्क्वॉशपटू सौरव घोषाल याने ०३ ऑक्टोबर रोजी जबरदस्त कामगिरी करत जपानच्या र्युनोसुके त्सुकेचा ३-० असा धुव्वा उडवत १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय स्क्वॉशमधील दिग्गज असलेल्या घोषालने ४५ मिनिटांत बाजी मारली. त्याने ११-५, १२-१०, ११-३ अशी कमांडिंग स्कोअरलाइन नोंदवली आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पुनरागमन करण्यासाठी जागा सोडली नाही.

    विथ्या रामराजने महिलांच्या ४०० मीटर हर्डल्स फायनलमध्ये कांस्यपदकासह अ‍ॅथलेटिक्स पदकाची सुरुवात केली. विथ्या रामराजने कांस्यपदकासह अ‍ॅथलेटिक्स पदकाची सलामी दिली. ट्रॅकवर उत्तम गती कायम ठेवत, विथ्याने महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत ५५.६८ अशी वेळ नोंदवली. पारुल चौधरीने महिलांच्या ५००० मीटरमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली कारण तिने जपानच्या रिरिका हिरोनाकाला शेवटच्या चिन्हापासून काही मीटर अंतरावर मागे टाकले. पारुलची वेळ १५:१४.७५ होती तर तिने जपानच्या रिरिकाने मागे टाकत सुवर्ण पटकावले.

    अब्दुल्ला अबूबकरने अंतिम उडी मारताना १६.७५ मी. प्रवीण चिथरावेलचा शेवटच्या उडीत अयशस्वी प्रयत्न झाला. पण त्याची १६.६३ मीटरची सर्वोत्तम उडी त्याला पुरुषांच्या तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत कांस्यपदक मिळवले आहे.