rafael nadal

टेनिसपटू (Tennis Player) राफेल नदाल याला कोरोनाची लागण (Rafael Nadal Corona Positive) झाली आहे.

    क्रीडाविश्वातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. टेनिसपटू राफेल नदाल याला कोरोनाची लागण (Rafael Nadal Corona Positive) झाली आहे. नदालने एका निवेदन जाहीर करत म्हटले आहे की, “मी सध्या कठीण काळातून जात आहे परंतु मला आशा आहे की मी हळूहळू बरा होईन. मी आता घरी परतलो आहे आणि माझ्या संपर्कात असलेल्यांना मी करोना संसर्ग झाल्याचं कळवलं आहे.”

    राफेल सध्या होम क्वारंटाईन( Rafael Nadal Home Quarantine) असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तत्पूर्वी, या आठवड्यात नदालने शुक्रवारी चार महिन्यांहून अधिक काळानंतर आपला पहिला सामना खेळला. तो अबू धाबी येथे एका स्पर्धेत अँडी मरेकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाला.२० वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन असलेल्या नदालच्या पायाच्या तीव्र दुखापतीमुळे त्याला या मोसमात शेवटी बाहेर बसावे लागले.

    वॉशिंग्टनमध्ये लॉयड हॅरिसकडून पराभूत झाल्यापासून नदालने ऑगस्टच्या सुरुवातीपासून स्पर्धा केली नव्हती. तो विम्बल्डन, टोकियो ऑलिम्पिक आणि यूएस ओपनला मुकला.