Rules, if any, like Australia; Tennis star Novak Djokovic sent home from the airport

जगातील टेनिसचा नंबर १ खेळाडू नोवाक जोकोविला ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जोकोविचच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. आता रविवारी ऑस्ट्रेलियाच्य् कोर्टासमोर त्यांची सुनावणी होणार आहे. जोकोविच हा सार्वजनिक धोका असल्याचे सरकारने सांगितले आहे. आता लसीकरणाशिवाय जोकविच ऑस्ट्रेलियात राहणार की नाही, हे आता कोर्ट ठरवणार आहे. यापूर्वी ऑस्टरेलियाचे इमिग्रेशन मंत्री एलेक्स हॉक यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता(World's Banner One player Djokovic in trouble again! The Australian government has revoked the visa, saying it was a public threat).

  मेलबर्न : जगातील टेनिसचा नंबर १ खेळाडू नोवाक जोकोविला ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जोकोविचच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. आता रविवारी ऑस्ट्रेलियाच्य् कोर्टासमोर त्यांची सुनावणी होणार आहे. जोकोविच हा सार्वजनिक धोका असल्याचे सरकारने सांगितले आहे. आता लसीकरणाशिवाय जोकविच ऑस्ट्रेलियात राहणार की नाही, हे आता कोर्ट ठरवणार आहे. यापूर्वी ऑस्टरेलियाचे इमिग्रेशन मंत्री एलेक्स हॉक यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता(World’s Banner One player Djokovic in trouble again! The Australian government has revoked the visa, saying it was a public threat).

  जोकोविचच्या वकिलांनी सरकारचा हा निर्णय तर्कहीन असल्याचे म्हटले आहे. याविरोधात कोर्टात याचिका केली सून, त्यावर रविवारी सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जोकविचला जर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळायची असेल, तर त्याला सोमवारपर्यंत स्पर्धेत सामील व्हावे लागले. जर जोकविच कोर्टात हरला, तर त्याचा व्हिसा रद्द होऊ शकतो. तसेच ऑस्ट्रेलियात येण्यासाठी तीन वर्षांची बंदीही घातली जाऊ शकते.

  कोरनाबाधित असतानाही कार्यक्रमांना उपस्थिती

  ऑस्ट्रेलियन ओपनला येण्यापूर्वी जोकविच कोरोनाबाधित होता. असे असतानाही त्याने आपल्या देशात सर्बियात नेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. पॉझिटिव्ह असतानाही पत्रकारांना भेटल्याची कबुही त्याने याआधीच दिली आहे. ऑस्ट्रेलियात येताना इमिग्रेशन फॉर्म भरताना त्यात चुकाही केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियात आल्यावर त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला होता.

  पहिल्यांदा व्हिसा रद्द झाल्यानंतर, कोर्टात गेलेल्या जोकोविच सरकारविरोधात खटला जिंकला होता. मेलबर्न कोर्टाने व्हिसा रद्द ,करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले होते. त्याचा पासपोर्ट आणि सामान परत करण्याचे आदेशही सरकारला देण्यात आले होते. त्यानंतर त्याने प्रॅक्टिसही सुरु केली होती.

  जोकोविचनेही इन्स्टावर पोस्ट करत, याने व्यथित झाल्याचे सांगितले होते. ऑस्ट्रेलियात आपल्या उपस्थितीने लोकांमधील चिंता कमी करण्य़ासाठी, अफवांबाबत स्पष्टीकरण देत असल्याचे त्याने सांगितले होते. रॅपिड टेस्टमध्ये निगेटिव्ह होतो, मात्र एकाच टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सर्व खबरदारी बाळगण्यात आल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. आपल्या सहकाऱ्याने चुकीची माहिती अर्जात भरल्याचे सांगत, कर्मचाऱ्याच्या वतीनेही त्याने क्षमा मागितली होती. ही एक मानवी चूक होती आणि याबाबत ऑस्ट्रेलियन सरकारला अतिरिक्त माहिती देण्यात आल्याचेही त्याने यापूर्वी सांगितले आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022