Commonwealth Games - Cycling - Women's 10km Scratch Race - Finals - Lee Valley VeloPark, London, Britain - August 1, 2022 India's Meenakshi Meenakshi reacts after falling in the women's 10km scratch race REUTERS/John Sibley - UP1EI811EGP4L
Commonwealth Games - Cycling - Women's 10km Scratch Race - Finals - Lee Valley VeloPark, London, Britain - August 1, 2022 India's Meenakshi Meenakshi reacts after falling in the women's 10km scratch race REUTERS/John Sibley - UP1EI811EGP4L

    बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये (Common wealth games 2022) चौथ्या दिवशी भारतीय (India) खेळाडूंनी उज्जवल कामगिरी करीत आणखी तीन पदकं (medal) प्राप्त केली आहेत. मात्र या पदकप्राप्तीचा आनंद लुटत असताना भारतीय क्रीडाप्रेमींच्या कानावर वाईट बातमी पडली. ती म्हणजे भारताच्या सायकलिंग (cycling) संघात समावेश असलेल्या मीनाक्षी हिचा सोमवारी रात्री स्पर्धेदरम्यान अपघात झाला आहे. मीनाक्षीचा अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून क्रीडा प्रेमींकडून याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

    राष्ट्रकुल स्पर्धेत १ ऑगस्ट रोजी सोमवारी महिलांच्या दहा किलोमीटर स्केच रन सायकलिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान भारतीय सायकलपटू मीनाक्षी ही वळण घेण्याच्या प्रयत्नात असतानाच तिची सायकल अडकल्याने ती ट्रॅकवर पडून जखमी झाली. यादरम्यान तिच्या पाठीमागूण येणा-या न्यूझीलंडच्या प्रतिस्पर्ध्याची सायकल मीनाक्षीच्या अंगावरुन गेली आणि न्यूझीलंडची खेळाडू देखील खाली कोसळली. या अपघातात सायकलवरून पडल्यानंतर मीनाक्षी जखमी झाली असून तिच्या सोबतच न्यूझीलंडच्या ब्रायोनी बोथालाही मार लागला आहे.

    अपघात झाल्यानं दोन्ही खेळाडूंना सामन्यातून बाहेर काढण्यात आलं असून या अपघातानंतर लगेचच तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिका-यांनी मीनाक्षीच्या दिशेने धाव घेऊन मीनाक्षीला तेथून स्ट्रेचरवर नेण्यात आले होते. या स्पर्धेत अपघाताच्या वेळी आघाडीवर असलेल्या इंग्लंडच्या लॉरा केनीचाही समावेश होता. या स्पर्धेत केनीने सुवर्णपदकाही कामे केली.

    मीनाक्षीच्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील ली व्हॅली वेलो पार्कमध्ये दोन दिवसांतील हा दुसरा अपघात आहे. याआधी इंग्लंडचा मॅट वॉल्सही या स्पर्धेदरम्यान सायकलवरून खाली पडला होता. मीनाक्षी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देशभरातील क्रीडाप्रेमी प्रार्थना करीत आहेत.