Terror attack on T20 World Cup 2024; Received threat from Pakistan

T20 World Cup 2024 Terror Threat : T-20 विश्वचषकाला 2 जूनपासून सुरू होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये यंदाचा टी20 विश्वचषक पार पडणार आहे.

  T-20 World Cup 2024 Terror Threat : T-20 विश्वचषकाला 2 जूनपासून सुरू होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये यंदाचा टी-20 विश्वचषक पार पडणार आहे. पण या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट ओढावलं आहे. होय. वेस्ट इंडिज आणि कॅरेबियन देशांमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. उत्तर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर क्रिकेट वेस्ट इंडिजने सावध पावले उचलली असून सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे.

  विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी

  उत्तर पाकिस्तानमधील आयएस-खोरासानकडून टी20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जगभरातील मोठ्या कार्यक्रमात हल्ला घडवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यामध्ये वेस्ट इंडिजमध्ये पार पडणाऱ्या टी20 विश्वचषकाचाही समावेश आहे. कॅरेबियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्याची माहिती आयएसचा मीडिया ग्रुप नाशिर पाकिस्तानमधून मिळाली आहे. त्रिनिदाद एक्सप्रेसनुसार, ‘नाशिर पाकिस्तान’ हा आयएस निगडीत प्रोपागेंडा (PROPAGANDA) चॅनेल आहे.

  प्रशासन अलर्ट
  ‘क्रिकबज’च्या रिपोर्ट्सनुसार, दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झालेय. प्रत्येक ठिकाणी मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा अलर्टमध्ये म्हटलेय की, “प्रो इस्लामिक स्टेट (आयएस)च्या मीडिया रिपोर्ट्सनुसार स्पोर्टिंग इव्हेंटदरम्यान हिंसाचार घडवण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये अफगानिस्तान-पाकिस्तान ब्रँचमधील व्हिडीओ समोर आलाय. त्यामध्ये अनेक देशांमध्ये हल्ल्याचा कट रचण्यात आलाय. त्याशिवाय समर्थकांना यामध्ये सामील होण्याची विनंती केली आहे.”

  क्रिकेट बोर्ड सावध
  दहशतवादी हल्ल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड सावध झालेय. त्यांनी सुरक्षेची कडेकोट व्यवस्था सुरु केली आहे. याबाबत वेस्ट इंडिज बोर्डाचे सीइओ जॉनी ग्रेव्स यांनी क्रिकबज यांना सांगितलं की, आम्ही यजमान देश आणि शहराच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. ग्लोबल लँडस्केपच्या निगरानी खाली सर्व सुरक्षा करण्यात येत आहे. स्पर्धेदरम्यान सर्व सुरक्षाव्यवस्था अधीक कठोर केली जाईल.

  पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात 20 संघ

  टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकात 20 संघाचा सहभाग झाला आहे. 2007 पासून टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली, पण हा इतिहासातील सर्वात मोठा टी20 विश्वचषक असेल. त्यामुळे सुरक्षेचीही सर्व काळजी घेण्यात येईल. आधापासूनच सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली होती. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे.