भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका? काय म्हणाला रोहित

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2012 - 13 मध्ये दोन्ही देशांदरम्यान मालिका खेळवण्यात आली होती.

    भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका : भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला पाहायला कोणाला आवडत नाही. ॲडम गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन यांनी आयोजित केलेल्या क्लब प्रेरी फायर पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता यामध्ये त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि सध्या तो त्यासंदर्भातील प्रश्नांच्या उत्तरांमुळे चर्चेत आहेत. यावेळी रोहित शर्माने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील कसोटी मालिकेवर तो मोकळेपणाने बोलला आहे.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2012 – 13 मध्ये दोन्ही देशांदरम्यान मालिका खेळवण्यात आली होती. मिसबाह-उल-हकच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्याच वेळी, 2007 नंतर दोन्ही देशांदरम्यान एकही कसोटी मालिका आयोजित केलेली नाही

    यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात परदेशी खेळपट्टीवर कसोटी मालिका आयोजित केली तर खेळायला आवडेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियमित द्विपक्षीय मालिका सुरू झाली तर ती खेळायला आवडेल.”असे रोहित शर्माने सांगितले. पुढे रोहित म्हणाला की, पाकिस्तान हा एक चांगला कसोटी संघ आहे आणि त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. परदेशी भूमीवर खेळलो तर खूप चांगली स्पर्धा होईल.

    श्रीलंका, बांग्लादेश किंवा यूएई या शेजारील देशांमध्ये दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका खेळवण्याची चर्चा झाली आहे. अलीकडेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डांनीही दोन्ही देशांचे यजमानपद भूषवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता.