p v sindhu

थायलंड ओपनच्या (Thailand Open 2022) उपांत्य पूर्व फेरीत अर्थात क्वॉर्टर फायनलमध्ये (Quarter Final) भारताची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने जपानच्या अकाने यामागुचीला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

    भारताची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने थायलंड ओपन २०२२ (Thailand Open 2022) स्पर्धेत उपांत्य फेरीचा (Semi Final) पल्ला गाठला आहे. तिने जपानची बॅडमिंटनपटू अकाने यामागुची (Akane Yamaguchi) हिला मात देत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

    पीव्ही सिंधूने याआधी भारताला दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवून दिले आहे. आता सिंधूने थायलंड कपमध्येही चांगली कामगिरी केली आहे. याआधी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये (tokyo olympics 2021) सिंधूने कांस्य पदक जिंकले होते. थायलंडच्या बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थायलंड ओपनमध्ये तिने सेमी फायनलपर्यंतचा टप्पा गाठला आहे.

    थायलंड ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीत अर्थात क्वॉर्टर फायनलमध्ये (Quarter Final) सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. एकूण तीन सेट्सपैकी दोन सेट्समध्ये विजय मिळवत सिंधूने सेमीफायनमध्ये धडक मारली आहे. सर्वात आधी पहिल्या सेटमध्ये सिंधूने २१-१५च्या फरकाने सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जपानच्या अकाने हिने पुनरागमन करत २०-२२ च्या फरकाने सेट जिंकला. पण अखेरच्या सेटमध्ये सिंधूने दमदार कामगिरी करत निर्णायत सेट २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला.