दैदिप्यमान सोहोळ्याने होणार फिफा विश्वचषक २०२२ ची सांगता; नोरा फतेही दाखवणार डान्सचा जलवा

भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता फिफा विश्वचषक २०२२ च्या समारोप सोहोळ्याला सुरुवात होईल. 88 हजार प्रेक्षक संख्येची क्षमता असणाऱ्या लुसेल स्टेडियमवर या समारोप सोहोळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये 29 दिवस सुरु असलेल्या फिफा विश्वचषक आधारित कविता आणि गाणी सादर केली जाणार आहेत.

    मुंबई : कतार येथे सुरु असलेली फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना आज पारपडणार आहे. रविवारी रात्री ८:३० वाजता हा सामना होणार असून यापूर्वी फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) चा समारोप सोहोळा पारपडणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून उदघाटन समारंभ प्रमाणेच हा सोहळा दैदिप्यमान होणार आहे.

    कतारच्या दोहा येथील लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (Argentian VS France) यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या आधी म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता फिफा विश्वचषक २०२२ च्या समारोप सोहोळ्याला सुरुवात होईल. 88 हजार प्रेक्षक संख्येची क्षमता असणाऱ्या लुसेल स्टेडियमवर या समारोप सोहोळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यामध्ये 29 दिवस सुरु असलेल्या फिफा विश्वचषक आधारित कविता आणि गाणी सादर केली जाणार आहेत.

    ‘अ नाईट टू रिमेंबर’ या थीमवर आधारित, 15 मिनिटांच्या या समारोपीय समारंभात अनेक जागतिक कलाकारांचे सादरीकरण ते अधिकृत फिफा विश्वचषक 2022  साउंडट्रॅकमधील गाण्यांच्या मॅशअपचा समावेश असेल. फिफा विश्वचषक 2022 च्या समारोप समारंभात भारतीय चाहत्यांसाठी बॉलीवूड स्टार नोरा फतेही बालकीस, रहमा रियाद आणि मनाल यांसारख्या जागतिक स्टार्ससोबत रंगमंचावर थिरकणार आहे. सर्व-महिला लाइनअप ‘लाइट द स्काय’ टू लाइव्ह परफॉर्म करतील – स्पर्धेचे अधिकृत थीम साँग. नायजेरियन गायक डेव्हिडो आणि कतारची स्वतःची आयशा ‘(हय्या हय्या) बेटर टुगेदर’ गातील, तर प्वेर्तो रिकन स्टार ओझुना आणि कॉंगोलीज रॅपर गिम्स अधिकृत वर्ल्ड कप साउंडट्रॅकमधील आणखी एक हिट गाणे अर्हबो सादर करण्यासाठी सहयोग करणार आहेत.

    फिफा विश्वचषक 2022 चा समारोप सोहळा आणि अंतिम सामना भारतातील Sports18 आणि Sports18 HD टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे तर चाहत्यांना लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema अॅप आणि वेबसाइटवर हा सामना विनामूल्य पाहता येईल.