आजपासून क्रिकेटच्या महाउत्सवास सुरुवात; गुजरात विरुद्ध चेन्नई रंगणार सलामीचा सामना, ‘या’ मान्यवरांची उपस्थिती, पण पावसाचे…?

या स्पर्धेचा आज मोठ्या थाटामोटात गुजरातमधील अहमदाबाद येथे शुभारंभ होणार आहे. तर या वर्षी ही स्पर्धा कोण जिंकणार? याचे तर्कवितर्क लढवले जात असून, महागड्या खेळाडूंवर सर्वांची नजर असणार आहे. दरम्यान, आज सलामीची लढत गुजरात विरुद्ध चेन्नई (Gujrat Vs Chennai) अशी रंगणार आहे. तर काल गुरुवारी अहमदाबाद (Ahmedabad) येथे मुसळधार पाऊस पडल्याने सामना होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

अहमदाबाद – क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महाउत्सवाला अर्थात, कुंभमेळ्याला आजपासून (31 मार्च) सुरुवात होत आहे. IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीग, जगातील सर्वात मोठी क्रिकेट (Cricket) लीग (Competition), आयपीएलचा (IPL 2023) 16 वा हंगाम शुक्रवार 31 मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा अतिशय रोमांचक होणार असून, स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक संघानी रणनीती आखली आहे. तर अनेक संघांमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. तर या स्पर्धेचा आज मोठ्या थाटामोटात गुजरातमधील अहमदाबाद येथे शुभारंभ होणार आहे. तर या वर्षी ही स्पर्धा कोण जिंकणार? याचे तर्कवितर्क लढवले जात असून, महागड्या खेळाडूंवर सर्वांची नजर असणार आहे. दरम्यान, आज सलामीची लढत गुजरात विरुद्ध चेन्नई (Gujrat Vs Chennai) अशी रंगणार आहे. तर काल गुरुवारी अहमदाबाद (Ahmedabad) येथे मुसळधार पाऊस पडल्याने सामना होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण आज देखील पावसाचे सावट असल्याचं बोललं जात आहे.

अनेक दिग्गजांची उपस्थिती…

क्रिकेट हा भारतीयांचा धर्म आहे, आणि आयपीएल म्हणजे क्रिकेटप्रेमीसाठी पर्वणीच असते. आजपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. कोरोनाचं सावट नसल्याने यंदा धडाक्यात रंगारंग व आकर्षक रोषणाईमध्ये आयपीएलची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकार परफॉर्मन्स करणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज हजर राहणार आहेत. त्यानंतर सलामीच्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

सामन्यावर पावसाचे सावट?

गुरुवारी 30 मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे चाहत्यांच्या मनात सामना रद्द होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. कारण गुरुवारी अहमदाबादेत जोरदार पाऊस पडला. खेळाडूंना सराव देखील करायला मिळाला नाही. या पावसामुळे हा सामना रद्द होणार का, अशी भीती क्रिकेट चाहत्यांना सतावतेय. एक्युवेदर या वेबसाईटनुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी झालेल्या पावसानं मैदानावर पाणीच पाणी झाले होते. गुजरात टायटन्सने पावसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळं आज सामना होणार की नाही? याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागलं आहे.

आज सलामीची लढत

दरम्यान, आज आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यानच्या सामन्याने 16 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. तरुण आणि अनुभवी खेळाडूंच्या रोमांचक सादरीकरणाने लीगमध्ये प्रेक्षकवर्ग आणि फॉलोइंगचे अनेक विक्रम मोडले गेले. तसेच अनेक नवोदित खेळाडूंना या स्पर्धेत संधी मिळणार आहे, त्यामुळं त्याच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा टॉप ऑर्डर बॅटर कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने मिनी ऑक्शनमध्ये 17.50 कोटींमध्ये खरेदी केले. ग्रीन पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे.

हे दहा खेळाडू आयपीएलमध्ये करणार डेब्यू…

प्रथमच या स्पर्धेत दहा खेळाडू पदार्पण करणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन, हॅरी ब्रूकशिवाय देशांतर्गत सामन्यांत चमकदार कामगिरी करणारा जम्मू काश्मीरचा  विक्रांत शर्मा आणि राज बावा यांचा समावेश आहे. याशिवाय नूर अहमद, जोशुआ लिटल, अफगाणिस्तानचा लेफ्ट आर्म पेसर फजल हक फारुखीला 50 लाखांत सनरायझर्सने आपल्या टीममध्ये घेतले होते. 2022 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने आपल्या टीमच्या विजयाती मोठी भूमिका बजावली होती. बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या 24 वर्षीय लेफ्ट आर्म पेसर यश ठाकूरला आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये लखनौ सुपरजायंटसने 45 लाखांत खरेदी केले होते.