वनडे मालिकेसाठी बांग्लादेशमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाचे दणक्यात स्वागत

गुरुवारी १ डिसेंबर रोजी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला. मुंबई विमानतळावरुन भारतीय संघ रवाना झाला होता. विराट कोहली आणि रोहित शर्मासह भारतीय संघाचे खेळाडूंचं बांगलादेश विमानतळावर पारंपारिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. खेळाडूंना पुष्पगुच्छल देण्यात आले.

    मुंबई : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात ४ डिसेंबरपासून एक दिवसीय सामन्याची मालिका सुरु होणार असून त्याकरता कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघ बांग्लादेश येथे पोहोचला आहे. भारतीय संघ बांग्लादेशच्या विमानतळावर पोहोचताच तेथे खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडूंच्या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून या फोटोला पसंती मिळत आहे.

    गुरुवारी १ डिसेंबर रोजी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला. मुंबई विमानतळावरुन भारतीय संघ रवाना झाला होता. विराट कोहली आणि रोहित शर्मासह भारतीय संघाचे खेळाडूंचं बांगलादेश विमानतळावर पारंपारिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. खेळाडूंना पुष्पगुच्छल देण्यात आले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह टीम इंडिया विमानतळावरुन हॉटेलमध्ये पोहचली आहे.

    भारतीय संघातील खेळाडू लवकरच सरावाला सुरुवात करतील. चार डिसेंबरपासून भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वीच बांगलादेशच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सुत्रांच्या महितीनुसार बांग्लादेशचा कर्णधार तमीम इकबाल दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे.