The inspirational history of the trinity of Yashasvi Jaiswal, Dhruv Jurel, Sarfaraz Khan, read in detail

IND vs ENG : भारतीय संघात नवख्या तरुण खेळाडूंनी त्यांच्या दर्जेदार खेळीने संघात चांगले स्थान निर्माण केले आहे. इंग्लडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने धमाकेदार द्विशतकं झळकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सरफराजने पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत दमदार अर्धशतकं झळकावली. ध्रुव ज्युरेलनंही पदार्पणात 46 धावांची खेळी खेळून आपली छाप उमटवली.

  Yashasvi Jaiswal, Dhruv Jurel and Sarfaraz Khan : भारतीय संघातील नवीन तरुण खेळाडूंनी त्यांच्या दमदार खेळीने इंग्लडच्या खेळाडूंना चांगलेच पाणी पाजले आहे. यामध्ये यशस्वी जयस्वालची धमाकेदार द्विशतक वाखाणण्याजोगे होते. टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंडविरोधात (England) पाच सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळत आहे. राजकोट कसोटी (Rajkot Test) सामन्या टीम इंडियानं तब्बल 434 धावांनी इंग्लंडचा धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासह 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे. राजकोट कसोटीत भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचे खरे मानकरी ठरले, टीम इंडियाचे नवखे युवा शिलेदार. यशस्वी जायस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल तिघांनीही टीम इंडियाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळली आणि विजयाचा मार्ग सुकर करून दिला.

  यशस्वी जायस्वालची दमदार द्विशतकं झळकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सरफराजनं पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत दमदार अर्धशतकं झळकावली. ध्रुव ज्युरेलनंही पदार्पणात 46 धावांची खेळी खेळून आपली छाप उमटवली. तसं पाहिलं तर यशस्वी जायस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचा टीम इंडियापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. तिघांच्याही नशीबी संघर्ष आला. पण तिघांनीही संघर्षावर मात करत, आपलं स्थान निश्चित केलं अन् आपली दखल घ्यायला सर्वांना भाग पाडलं.

  इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा टीम इंडियाचा यशस्वी जैसवाल (Who Is Yashasvi Jaiswal?)
  उत्तर प्रदेशातील भदोहीहून मुंबईत पोहोचलेल्या यशस्वी जायस्वालनं आपल्या आयुष्यात खूप संघर्ष पाहिला. त्याची कहाणी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. तो एका डेअरीत काम करायचा आणि पाणीपुरीही विकायचा. 28 डिसेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील भदोही येथे जन्मलेल्या यशस्वी जैसवालनं वयाच्या बाराव्या वर्षी मुंबई गाठली आणि आझाद मैदानावर क्रिकेटची ABCD शिकायला सुरुवात केली.

  आझाद मैदानात तो मुस्लिम युनायटेड क्लबचे प्रशिक्षक इम्रान सिंह यांच्या संपर्कात आला. प्रशिक्षक इम्रान सिंह यांनी त्याला सांगितलं की, जर त्यानं सामन्यात उत्तम कामगिरी केली, तर त्याला तंबूत राहायला मिळेल. एके दिवशी प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी यशस्वीला हेरलं. त्यानंतर प्रशिक्षक ज्वाला यांनी यशस्वीला टीम इंडियासाठी तयार करण्याचं काम हाती घेतलं आणि त्याला सांताक्रूझच्या उपनगरातील कोचिंग संस्थेत नेलं.
  विजय हजारे ट्रॉफीनं मिळवून दिली खरी ओळख
  यशस्वीच्या आयुष्यानं यू-टर्न घेतला ऑक्टोबर 2013 मध्ये, ज्यावेळी त्यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 113, 22, 122, 203 आणि नाबाद 60 धावांची खेळी खेळली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी यशस्वीनं दक्षिण आफ्रिकेमध्ये अंडर 19 वर्ल्डकपमध्ये शानदार फलंदाजी करत आपली छाप सोडली त्याच सामन्यात 2014 अंडर 19 वर्ल्डकपमध्ये यशस्वीला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आलं. तसेच, यावर्षी भारतीय युवा संघ उपविजेता ठरला. यशस्वी जैसवालनं टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 कसोटी आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये, यशस्वी जैसवालनं 71.75 च्या सरासरीनं 861 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यशस्वीच्या नावावर 33.46 च्या सरासरीनं 502 धावा आहेत. यशस्वीनं आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत.

  यशस्वी जायस्वालनं आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहा डावांत 109 च्या सरासरीनं 545 धावा केल्या आहेत, ज्यात दोन द्विशतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. या काळात यशस्वीचा स्ट्राईक-रेट 81.1 आणि सरासरी 109 होता. यशस्वीचा स्ट्राईक-रेट ऑली पोप (65.66), जो रूट (49.94), जॅक क्रॉली (67.06) आणि बेन स्टोक्स (57.22) यांसारख्या इंग्लिश फलंदाजांपेक्षा चांगला आहे. यशस्वीनं सध्याच्या मालिकेत 50 चौकार आणि 22 षटकार मारले आहेत. म्हणजेच, त्यानं चौकार आणि षटकारांसह 332 धावा केल्या आहेत.

  कधीकाळी आईनं दागिने विकून क्रिकेट किट खरेदी करुन दिलं, आज ध्रुव जुरेलनं कष्टाचं चीज केलं (Who Is Dhruv Jurel?)
  21 जानेवारी 2001 रोजी आग्रा येथे जन्मलेला ध्रुव जुरेल 2020 मध्ये अंडर-19 वर्ल्डकप खेळणाऱ्या टीम इंडियाचा उपकर्णधार होता. त्यानंतर टीम इंडियाला DLS अंतर्गत अंतिम फेरीत बांगलादेशकडून 3 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. विकेटकीपर आणि फलंदाज असलेल्या ध्रुव जुरेल मधल्या फळीत फलंदाजी करतो, त्यानं लगावलेला एक एक फटकार क्रिकेट प्रेमींच्या काळजाचा ठाव घेतो. ध्रुव जुरेल देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतो.

  कारगिल युद्धात लढलेच वडील
  ध्रुव जुरेल याचे वडील नेम सिंह जुरेल कारगिल युद्धात लढले आहेत. ध्रुवलाही आपल्या वडिलांप्रमाणेच सैन्यात जायचं होतं. आर्मी स्कूलमध्ये शिकत असतानाच ध्रुवनं स्विमिंग शिकला. त्यानंतर घराबाहेर रस्त्यावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता ध्रुवला क्रिकेटची गोडी लागली. एका मुलाखतीत बोलताना ध्रुवनं त्याला अभ्यास करायला कधीच आवडायचं नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्याला क्रिकेट खेळायला आवडायचं. पण, वडिलांना ध्रुवचं क्रिकेट खेळणं फारसं आवडायचं नाही. एक आठवणही याबाबत ध्रुवनं सांगितली होती की, एक दिवस त्याचे वडिल वर्तमानपत्र वाचत होते आणि त्यांनी ध्रुवला म्हटलं की, एका क्रिकेटरचं नाव तुझ्यासारखंच आहे, त्यानं खूप धावा केल्यात. त्यावेळी ध्रुव खूपच घाबरला होता. त्यानं वडिलांना तो क्रिकेटर मीच आहे, असं सांगितलं नाही. वडिलांना कळालं तर वडील क्रिकेट खेळू देणार नाहीत, या भितीनं ध्रुवनं वडिलांना सांगितलंच नाही.

  आईनं दागिने विकून क्रिकेट किट खरेदी केलं
  काही काळानं ध्रुव जुरेलला कळून चुकलं होतं की, क्रिकेटमध्येच त्याचं फ्युचर आहे. त्याला वयाच्या 14व्या वर्षी एक क्रिकेट किट हवं होतं. पण त्यावेळी त्याच्या वडिलांनी अभ्यासावर लक्ष द्यायला सांगितलं. तेव्हा त्याच्या आईनं आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली सोन्याची चेन विकली. ध्रुव जुरेलनं सांगितलं होतं की, त्याला काश्मीर विलोची बॅट खरेदी करायची होती, जी त्यावेळी जवळपास 1500 ते 2000 रुपयांची होती, पण त्यावेळी त्याच्या कुटुंबासाठी ते शक्य नव्हतं. तरीदेखील त्याच्या वडिलांनी त्याला बॅट खरेदी करुन दिली. पण ज्यावेळी संपूर्ण किट विकत घेण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र ते बजेटमध्ये बसणारं नव्हतं.

  क्रिकेट कीटसाठी घरातून नकार आल्यानंतर ध्रुवनं स्वतःला बाथरुममध्ये बंद केलं आणि घरातल्यांना धमकी दिली. जर मला क्रिकेट कीट दिलं नाहीतर, मी पळून जाईल, असं ध्रुवनं सांगितलं त्यानंतर मात्र त्याची आई भावूक झाली. तिनं आपली सोन्याची चेन ध्रुवच्या वडिलांना दिली आणि सोन्याची चेन विकून क्रिकेट किट विकत आणण्यास सांगितलं. त्यावेळी ध्रुव खूप खूश झाला होता, पण मोठं झाल्यानंतर त्याला त्याच्या आईनं केलेल्या त्यागाची जाणीव झाली.

  23 वर्षांच्या ध्रुव जुरेलनं आयपीएल 2023 मध्ये आपल्या कामगिरीनं सर्वांनाच धक्का दिला होता. आयपीएल 2023 मध्ये जुरेलनं 13 सामन्यांमध्ये 152 धावा 21.71 च्या सरासरीनं आणि 172.73 च्या स्ट्राईक रेटनं धावांचा डोंगर रचला. ध्रुव जुरेलचा आयपीएलमधील डेथ ओव्हर्समध्ये (17-20) स्ट्राइक रेट खूप मजबूत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सनं जुरेलला 20 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते.

  आयपीएल 2023 च्या हंगामात ध्रुवच्या धावांचे आकडे कमी असतील, परंतु त्याने काही डाव खेळले ज्या लक्षात आल्या. त्याने प्रभावशाली खेळाडू म्हणून पदार्पण केले. 5 एप्रिल 2023 रोजी, त्याने गुवाहाटी येथे पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्ससाठी 15 चेंडूत 32 धावांची शानदार खेळी खेळली. हे देखील आश्चर्यकारक आहे की ज्युरेल संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळला, ज्याच्या आधी त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

  मैदानावर येतोच वादळासारखा अन् पहिल्या बॉलपासून गोलंदाजांवर तुटून पडतो टीम इंडियाचा सरफराज खान (Who Is Sarfaraz Khan?)
  26 वर्षाचा सरफराज खाननंही कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करुन सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं. जवळपास 70 च्या सरासरीनं फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 45 प्रथम श्रेणीतील देशांतर्गत सामने खेळायला लावले. म्हणजेच, टीम इंडियाची जर्सी घालण्यापर्यंतचा सरफराजचा प्रवास फार सोपा नव्हता. त्याला नॅशनल कॉल ऑफसाठी खूप वाट पाहावी लागली.

  सरफारजला ऐकावे लागलेत टोमणे…
  सरफराजला कधी त्याच्या वजनावरुन तर कधी त्याच्या स्वभावरुन टोमणे मारले जायचे. वजन जास्त असल्यामुळे त्याला संघात निवडलं जायचं नाही. देशांतर्गत क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत त्याच्या वजनावरुन खिल्ली उडवली जायची. कोणत्याही युवा खेळाडूसाठी असं ट्रोल होणं मानसिकदृष्टा खचवणारंच असेल. पण सरफराजनं आपल्या दमदार खेळीनं सर्व आरोप खोडू काढले. त्यानं सिद्ध केलं की, फक्त स्लिम-ट्रिम दिसणंच फिटनेस नाही.

  मुंबईच्या संघातून खेळणारा सरफराज खान मुळचा उत्तर प्रदेशच्या आजमगढचा. पण तो मुंबईमध्येच राहतो. सरफराजचे वडील नौशाद यांनी आपल्या मुलांचं करिअर घडवण्यासाठी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. सरफराज आपल्या कुटुंबांसह कुर्ल्यातील टॅक्सीमन कॉलनीत राहतो. नौशाद आपली तीन मुलं सरफराज खान, मुशीर खान आणि मोईन खान यांना स्वतःच प्रशिक्षण देतात. नौशाद यांनी आपल्या गावातील अनेक मुलांना मुंबईत आणलं आणि त्यांना क्रिकेट शिकवलं. इक्बाल अब्दुल्ला आणि कामरान खान यांसारख्या स्टार खेळाडूंचेही ते प्रशिक्षक आहेत.

  नौशाद खान यांच्या कष्टाचं चीज झालं असून आता सरफराज खाननं भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं आहे. सरफराजनं आतापर्यंत 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4042 धावा केल्या आहेत. ज्यात 14 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. सरफराज खानची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 301 आहे आणि सरासरी सुमारे 71 (70.91) आहे. सरफराज खान दिग्गज खेळाडूंना प्रथम श्रेणीच्या सरासरीनुसार स्पर्धा देत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या तीन रणजी हंगामात सरफराजची सरासरी 100 च्या वर आहे.

  बेस्ट बॅटिंग एव्हरेज फर्स्ट क्लास मॅच (मिनिमम 50 पारी)
  डॉन ब्रॅडमन : 234 मॅच 28067 धावा, 95.14 सरासरी
  विजय मर्चेंट : 150 मॅच 13470 धावा, 71.64 सरासरी
  जॉर्ज हॅडली : 103 मॅच 9921 धावा, 69.56 सरासरी
  सरफराज खान : 46* मॅच 4042 धावा, 70.91 सरासरी

  टेस्ट डेब्यू पर प्रत्येक डावांत 50+ स्कोर (टीम इंडिया)
  दिलावर हुसैन 59 & 57 vs इंग्लंड,1934
  गावस्कर 65 & 67* vs वेस्ट इंडीज, 1971
  श्रेयस अय्यर 105 & 65 vs न्यूजीलंड, 2021
  सरफराज खान 62 & 68* vs इंग्लंड, 2024