
मुंबईने चेन्नईविरुद्धचा सामना २० धावांनी गमावला होता. तर कोलकाताने दुसऱ्या टप्प्यात दमदार पुनरागमन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ९ गडी राखून दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेतील गुणतालिकेत ८ गुणांसह मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे.
आयपीएल २०२१ च्या स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रणधुमाळी रंगणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएलचा पहिला सामना झाला होता. परंतु चेन्नईने मुंबईवर दणदणीत विजय मिळवला. तसेच मुंबईचा संघ मागच्या सामन्यात रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या व्यतिरिक्त खेळला होता. दुखापतीमुळे या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. आजच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अजूनही शंका आहे.
मुंबईने चेन्नईविरुद्धचा सामना २० धावांनी गमावला होता. तर कोलकाताने दुसऱ्या टप्प्यात दमदार पुनरागमन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ९ गडी राखून दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेतील गुणतालिकेत ८ गुणांसह मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे.