मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये आज होणार महामुकाबला, जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज ; कोण बाजी मारणार?

आयपीएल प्लेऑफमध्ये टिकण्यासाठी दोन्ही संघ विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. सलग तीन पराभवानंतर मुंबईवर या सामन्यात दरवर्षी चांगली कामगिरी करण्याचा दबाव आहे. मुंबईचा संघ आरसीबी आणि चेन्नईविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करू शकला नाही. तर कोलकाताविरुद्ध ते प्रथम फलंदाजी करून पराभूत झाले.

    नवी दिल्ली: आयपीएल (IPL 2021) मध्ये आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा (PBKS Vs MI) संघ भिडणार आहे. दोन्ही संघांमधील सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. आयपीएलमध्ये दोन्ही संघांचे प्रत्येकी आठ गुण आहेत. पण रन रेटच्या (Run Rate) आधारावर पंजाब किंग्ज पुढे आहेत. पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे, तर मुंबईचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.

    आयपीएल प्लेऑफमध्ये टिकण्यासाठी दोन्ही संघ विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. सलग तीन पराभवानंतर मुंबईवर या सामन्यात दरवर्षी चांगली कामगिरी करण्याचा दबाव आहे. मुंबईचा संघ आरसीबी आणि चेन्नईविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करू शकला नाही. तर कोलकाताविरुद्ध ते प्रथम फलंदाजी करून पराभूत झाले.

    असा असेल संघ –

    पंजाब किंग्ज : केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, शाहरुख खान, मोहम्मद शमी, नाथन एलिस, आदिल रशीद, मुरुगन अश्विन, दर्शन नलकंडे, प्रभुसिमरन सिंह, रवी बिश्नोई, उत्कर्ष सिंह, फॅबियन लेलन, सौरभ कुमार, जलज सक्सेना, हरप्रीत ब्रार, मोईसेस हेन्रिक्स, ख्रिस जॉर्डन, एडन मार्कराम, मनदीप सिंग.

    मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, कृणाल पांड्या, जेम्स नीशम, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पंड्या, मोहसीन खान, नॅथन कुल्टर-नाईल, पियुष चावला, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मार्को जॅन्सेन, युधवीर सिंग, अॅडम मिल्ले, धवल कुलकर्णी यांचा समावेश आहे.