प्लेऑफची शर्यत रंगतदार! कोणते संघ करणार आयपीएल 2024ची शर्यत पास?

कोलकाताचा संघाला अजून पर्यत प्लेऑफमध्ये जागा मिळालेली नाही. त्यांच्या मागोमाग 16 दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे.

    प्लेऑफची शर्यत : इंडियन प्रीमियर लीग 2024 (Indian Premier League 2024) मध्ये 55 सामने झाले आहेत आणि अजून एकही संघाने प्लेऑफमध्ये जागा मिळवलेली नाही. जर आपण गुणतालिकेतील पहिल्या चार संघाबद्दल विचार केला तर सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ अव्वल स्थानावर आहे. कोलकाताचे 16 गुण आहेत. परंतु कोलकाताचा संघाला अजून पर्यत प्लेऑफमध्ये जागा मिळालेली नाही. त्यांच्या मागोमाग 16 दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ आहे. महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर तर हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) संघ मुंबई इंडियन्सकडून पराभव झाल्यानंतर चौथ्या स्थानावर कायम आहे. हैदराबादचे आतापर्यत 12 गुण आहेत.

    कोलकाता आणि राजस्थान यांचे प्लेऑफमध्ये स्थान जवळपास निश्चित आहे. पण हे दोन्ही संघ अद्याप पूर्णपणे पोहोचलेले नाहीत. आयपीएल 2024 च्या या नव्या हंगामात अनेक रेकॉर्ड मोडले आहेत आणि नवे रेकॉर्ड झाले आहेत. 55 सामने पूर्ण झाल्यांनंतरही अजून एकही संघ प्लेऑफमध्ये गेलेला नाही. या सीझनचे 15 साखळी सामने बाकी आहेत आणि 9 संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे या सिझनची प्लेऑफची शर्यत रंगतदार आहे. मुंबई इंडियन्स हा एक संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. पण आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स सारखे संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत.

    आजचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान यांच्यामध्ये रंगणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने विजय मिळवल्यास ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना महत्वाचा आहे.