फिफा विश्वचषकात आजपासून उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना सुरुवात

फिफा विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत गेलेल्या देशांपैकी पाच देश हे युरोप खंडातील आहेत. यामध्ये क्रोएशिया, नेदरलँड्स, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या बलाढ्य देशांचा समावेश आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत होणार आहेत.

    मुंबई : कतार येथे सुरु असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात प्रवेश करीत आहे. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती मंगळवारी मध्यरात्री संपल्या असून आता शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नऊ देशांचे संघ पोहोचले असून यात उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांमध्ये क्रोएशिया, नेदरलँड्स, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण अमेरिका, मोरोक्को यांचा समावेश आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने ९ डिसेंबर ते १० डिसेंबर पर्यंत होणार आहेत.

    फिफा विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत गेलेल्या देशांपैकी पाच देश हे युरोप खंडातील आहेत. यामध्ये क्रोएशिया, नेदरलँड्स, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या बलाढ्य देशांचा समावेश आहे. तर उरलेले दोन देश हे दक्षिण अमेरिकेतील आहेत. ब्राझील व अर्जेंटिना या देशांचा त्यामध्ये समावेश आहे. आफ्रिका खंडातील एकमेव देश मोरोक्कोच्या रूपात या वेळी दिसत आहेत. मोरोक्कोचे यश कौतुकास्पद आहे.

    उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

    ९ डिसेंबर – ब्राझील विरुद्ध क्रोएशिया – ८:३० रात्री
    १० डिसेंबर – नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना – १२:३० रात्री
    १० डिसेंबर – मोरोक्को विरुद्ध पोर्तुगाल – ८: ३० रात्री
    ११ डिसेंबर – इंग्लंड विरुद्ध फ्रान्स – १२:३० रात्री