उद्यापासून उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात, उद्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार

मंगळवारी (24 मे रोजी) क्वालिफायर एकची मॅच गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये खेळविण्यात येत आहे. तर बुधवारी क्वालिफायरची दुसरी मॅच बुधवावारी (25 मे रोजी) लखनऊ सुपर जायंटस आणि बंगळुरु बुल्स यांच्यात भिडत रंगणार आहे. आयपीएलचे 15 व्या हंगामाची 29 मे रोजी अंतिम सामना खेळविला जाणार आहे. आता उर्वरित चार संघातील सामन्याचे समीकरण म्हणजे जो संघ जिंकेल त्याला पुढे संधी मिळणार आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामधील सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट अंतिम सामन्यात धडक मारेल. आणि जो पराभूत संघ होईल तो लखनऊ सुपर जायंटस आणि बंगळुरु बुल्स यांच्यातील विजयी संघाबरोबर त्यांचा सामना होईल.

    मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचे साखळी फेरीतील सामने आता संपले असून मंगळवारपासून प्ले ऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. दरम्यान, आयपीएलचे 15 वे हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी याआधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर उरलेल्या संघांमध्ये प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी चढाओढ सुरू होती. रविवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. येत्या 29 मे रोजी आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान मंगळवारपासून सेमीफायल सामन्यांना सुरुवात होत आहे.

    दरम्यान, मंगळवारी (24 मे रोजी) क्वालिफायर एकची मॅच गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये खेळविण्यात येत आहे. तर बुधवारी क्वालिफायरची दुसरी मॅच बुधवावारी (25 मे रोजी) लखनऊ सुपर जायंटस आणि बंगळुरु बुल्स यांच्यात भिडत रंगणार आहे. आयपीएलचे 15 व्या हंगामाची 29 मे रोजी अंतिम सामना खेळविला जाणार आहे. आता उर्वरित चार संघातील सामन्याचे समीकरण म्हणजे जो संघ जिंकेल त्याला पुढे संधी मिळणार आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामधील सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट अंतिम सामन्यात धडक मारेल. आणि जो पराभूत संघ होईल तो लखनऊ सुपर जायंटस आणि बंगळुरु बुल्स यांच्यातील विजयी संघाबरोबर त्यांचा सामना होईल. आणि त्यातून जो संघ जिंकेल तो थेट अंतिम सामन्यात पोहचेल. म्हणजे उद्या होणाऱ्या सामन्यात पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.

    उर्वरित चार संघातील जय-विजयाची समीकरण वेगळी असली तरी, आता जिंका किंवा मरा असेच चार संघाना खेळावे लागणार आहे. नाहीतर, स्पर्धेतून बाद होण्याची त्यांच्यावर नामुष्की येणार आहे. त्यामुळं उद्या होणाऱ्या क्वालिफायर एकच्या मॅचमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यां संघाना आपल्याला साजेसा खेळ करावा लागणार आहे. त्यातून पराभव होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.