‘या’ प्रसिद्ध खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू! भावानेच गोळ्या झाडत केला खून

    संपूर्ण क्रीडा जगताला हादरा देणारी बातमी समोर आली आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये (Boxing ) भल्याभाल्यांना चितपट करणाऱ्या खेळाडूला मात्र स्वतःच्याच भावाने मृत्यूच्या खाईत लोटले. बॉक्सिंग मधील प्रसिद्ध खेळाडू इसिया जोन्स (Boxer Isiah Jones) याच्यावर कौटुंबिक वादातून त्याच्या भावाने गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात इसिया जोन्सचा मृत्यू झाला असून त्याने वयाच्या २८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

    मिशिगनमधील डेट्रॉइट इथं ही हादरवणारी घटना घडली असून सदर भागात कौटुंबीक वादातून एका व्यक्तीने स्वत:च्याच भावाचा खून केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तेव्हाच आघाडीच्या बॉक्सरचा इथं करुण अंत झाल्याची बाबप उघडकीस आली. पोलिसांनी लगेचच याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून या संदर्भात कारवाईला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरत असून इसिया जोन्स हा आता याजगात नाही हे वृत्त त्याच्या चाहत्यांना हेलावून टाकत आहे.