
Cricket World Cup Final | टीम इंडिया वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच सुरु आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी ट्रॉफी दिली जाते, ती ओरिजन ट्रॉफी असते का? 2011 यावरुन वाद झालेला त्यातून सत्य समोर आलेलं.
अहमदाबाद : भारतीय क्रिकेट टीम चौथ्यांदा वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा सामना पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु आहे. टीम इंडियाने 2011 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाने फायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला हरवलं होतं. त्यानंतर वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवरुन वाद निर्माण झाला होता. हा वाद खूप वाढत गेला होता. पुढे आयसीलीला यावर स्पष्टीकरण द्याव लागलं होतं.
एमएस धोनीला जी ट्रॉफी दिली…
फायनल जिंकल्यानंतर एमएस धोनीला जी ट्रॉफी दिली, त्यावरुन हा सर्व वाद होता. एमएस धोनीला जी ट्रॉफी दिली गेली, ती ओरिजन ट्रॉफी नाहीय असं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. नकली ट्रॉफी असल्याची चर्चा सुरु झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
माजी क्रिकेटपटू नाराज झाले होते
मुंबईच्या कस्टम विभागाकडे ओरिजन ट्रॉफी असल्याच मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. पेमेंटमध्ये काही अडचणी असल्याने ट्रॉफी दिली नाही, असं रिपोर्ट्समध्ये दावा केला होता. मीडियामध्ये ही बातमी आल्यानंतर अनेक फॅन्ससह काही माजी क्रिकेटपटू नाराज झाले होते. त्यानंतर आयसीसीने यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आयसीसीने मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेली बातमी चुकीची असल्याच म्हटलं होतं. टीम इंडियाचा कॅप्टन धोनीला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी ट्रॉफी दिली गेली, ती ओरिजनल ट्रॉफी आहे. क्रिकेट वर्ल्ड कप 2011 साठी बनवलेली ट्रॉफीच धोनीला दिली गेलीय, त्यावर इवेंटचा लोगो सुद्धा आहे, असं स्पष्टीकरण आयसीसीने दिलं होतं.
मग, कस्टमकडे कुठली ट्रॉफी होती?
आयसीसीच्या मुख्यालयात ठेवली जाणारी ट्रॉफी कस्टम विभागाकडे आहे अशी माहिती आयसीसीने दिली होती. फक्त प्रमोशनल इवेंट्ससाठी ती ट्रॉफी आणली जाते, असं आयसीसीने म्हटलं होतं. या ट्रॉफीवर आयसीसीचा कॉर्पोरेट लोगो तसेच 2011 टुर्नामेंटचा लोगो नाहीय, असं त्यावेळी सांगितलं होतं. ही ट्रॉफी पुन्हा दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात नेली जाईल, असं आयसीसीकडून सांगण्यात आलं होतं. प्रत्येक वर्ल्ड कपसाठी नवीन ट्रॉफी बनवली जाते, हे आयसीसीने स्पष्ट केलं होतं. ओरिजनल ट्रॉफी नेहमीच आयसीसीच्या मुख्यालयात असते.