वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्स इंग्लंडमध्येच होणार

    आयसीसीने २०२३ आणि २०२५ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्स (World Test Championship finals) ही यंदा देखील इंग्लंडच्या मैदानावरच खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही फायनल इंग्लंडच्या ओव्हल आणि लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जुलै महिन्यात बर्मिंगहम येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सभेवेळी इंग्लंडला दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्सचे आयोजक करण्यात आले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल्सचे ठिकाण जाहीर झाले असले तरी अदयाप याच्या तारखेची घोषणा होणार नाही.

    आयसीसीचे सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी ‘आम्हाला आनंद आहे की, पुढच्या वर्षी WTC फायलनचा आयोजक द ओव्हल असणार आहे. त्यानंतर आम्ही २०२५ ची फायनल लॉर्डवर खेळवणार आहोत.’ असे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात साऊथम्प्टनमध्ये झालेला अंतिम सामना रोमांचक झाला. मला आशा आहे की जगभरातील क्रिकेट चाहते द ओव्हलवर होणाऱ्या WTC फायनलची वाट पाहत आहेत.’ पहिल्या WTC फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करत पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती.

    मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) चे सीइओ आणि सचिव गे लेवेंडर यांनी सांगितले की, ‘२०२५ ला लॉर्ड्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे यामुळे आम्ही खूप खूष आहोत.’ WTC ची दुसरी फेरी ही ४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ही फेरी पुढच्या वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. सद्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल देखील इंग्लंडमध्येच झाली होती.