T20  विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीत खेळणार ‘हे’ चार संघ ; सर्वांत मोठी भविष्यवाणी ठरणार खरी?

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने एक मोठी भविष्यवाणी केली असून त्याने T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणार्‍या चार संघांची नावे सांगितली आहेत.वॉर्नने ट्विट करून ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील प्रत्येकी दोन संघांची नावे दिली आहेत

    सध्या दुबई येथे सुरु असलेल्या T20 वर्ल्डकपमध्ये भारताने सुमार कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. विश्वचषकाचे विजेतेपद मिळविण्यासाठी सर्व संघ लढत आहेत. आतापर्यंतच्या स्पर्धेत मोठे चढ-उतार पहायला मिळाले. मात्र आता एक भविष्यवाणी करण्यात आली आहे. जाणून घेऊयात याबद्दल.

     

    ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने एक मोठी भविष्यवाणी केली असून त्याने T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणार्‍या चार संघांची नावे सांगितली आहेत.वॉर्नने ट्विट करून ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील प्रत्येकी दोन संघांची नावे दिली आहेत, जे उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात. शेनच्या मते, ग्रुप 1 मधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, तर ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तान हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतात. शेनच्या मते ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड किंवा भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचेल.