टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज चुरशीची लढाई, शेवटच्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज

इंग्लंडने या भारत दौऱ्यात एकदिवसीय मालिकेआधी कसोटी आणि टी-२० मालिका खेळली. या दोन्ही मालिका जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका विजयांची हॅटट्रिक साजरी करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची अपेक्षा आहे.

    पुणे :  टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. यामध्ये टीम इंडियाचा ६ गडी राखुन पराभव करण्यात आला. आता तिसरा आणि शेवटचा सामना आज (रविवार) खेळला जाणार आहे. तसेच दोन्ही संघामध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे.

    इंग्लंडने या भारत दौऱ्यात एकदिवसीय मालिकेआधी कसोटी आणि टी-२० मालिका खेळली. या दोन्ही मालिका जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका विजयांची हॅटट्रिक साजरी करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची अपेक्षा आहे.

    पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये फिरकीपटूंच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना अधिक यश मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडिया विजयाची सलामी ठोकणार का,हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे.