टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंची लागणार वर्णी, वाचा कोणाला मिळणार स्थान आणि कोण असणार बाहेर

आयपीएल 2024 मधील चमकदार कामगिरीच्या जोरावर कोणत्या 15 जणांना वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार यांची उत्सुकता सर्वांना आहे.

    टी-20 वर्ल्ड कप 2024 : सध्या इंडियन प्रीमियर लीग 2024 ची क्रेझ संपूर्ण जगभरामध्ये पसरली आहे. याचदरम्यान कोण टी-20 वर्ल्ड कप 2024 खेळणार याकडे सुद्धा क्रिकेट चाहत्यांची नजर आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2024 थरार 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे. आयपीएलमध्ये बरेच खेळाडू उत्तम कामगिरी करतात पण ते बऱ्याचवेळा इंटरनॅशनल सामन्यांमध्ये कामगिरी करत नाही. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा त्याचबरोबर अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघामध्ये कोणत्या खेळाडूला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा कधी पण केल्या जाऊ शकते. टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ घोषित करण्यासाठी आयसीसीने 1 मे ही तारीख दिली आहे. आयसीसीने सांगितले आहे की, या तारखेपर्यंत सर्व देशांना आपापले संघाची घोषणा करायची आहे. भारतीय चाहतेही संघामध्ये कोणाची निवड होणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल 2024 मधील चमकदार कामगिरीच्या जोरावर कोणत्या 15 जणांना वर्ल्ड कपचं तिकीट मिळणार यांची उत्सुकता सर्वांना आहे.

    टी-20 वर्ल्ड कप 2024 कोणते फलंदाज, गोलंदाज, विकेटकीपर,ऑलराउंडर, स्पिनर्स यांचा समावेश असणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली हे जवळपास निश्चित झाले आहेत. यामध्ये नुकताच भारतीय संघामध्ये समावेश झालेले सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग यांनाही खेळण्याची संधी मिळू शकते. यशस्वी जैस्वालने कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली आहे परंतु त्याचा आयपीएल २०२४ चा हा सिझन फार चांगला नाही. तर रिंकू सिंगनेही फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे.

    दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने आता पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या संघासाठी स्फोटक फलंदाजी सुद्धा केली आहे. त्यामुळे तो स्फोटक खेळी खेळून फॉर्ममध्ये येण्याची चिन्हे दाखवली आहेत. त्याचबरोबर संजू सॅमसनचा सुद्धा टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. संजू सॅमसनला दुसरा यष्टिरक्षक म्हणून जागा मिळू शकते. चेन्नई सुपर किंगचा ऑलराउंडर शिवम दुबे सध्या संघासाठी चमकदार कामगिरी करत आहे. असे म्हंटले जात आहे की, शिवम दुबे हा हार्दिक पांड्याच्या जागेसाठी स्पर्धा करत आहे. पण या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते. हार्दिक आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे.

    अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही संघात जागा जवळपास निश्चित आहे. अक्षर पटेलपेक्षा जडेजाला प्राधान्य दिले जाऊ शकते. आयपीएल 2024 च्या त्याचबरोबर आयपीएलच्या इतिहासातला यशस्वी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा समावेश केला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना गोलंदाजी युनिटमध्ये स्थान मिळणार निश्चित झालेले दिसत आहे.