‘हा’ भारतीय गोलंदाज लवकरच घेणार निवृत्ती

    भारतीय क्रिकेट संघातील स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. भारतीय संघात खेळण्यासाठी प्रत्येक जागेसाठी तीन ते चार खेळाडू दावेदार आहेत. मात्र भारतीय खेळाडूंमधील याच स्पर्धेमुळे भारतीय संघासाठी तब्बल १०० कसोटी सामने खळणाऱ्या दिग्गज गोलंदाज आता निवृत्ती घेण्याच्या मार्गवर आहे.

    टीम इंडियाकडे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ) आणि मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज आहेत. हे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant sharma) संघातून गायब झाला आहे. इशांतला अनेक महिन्यांपासून संघात स्थान मिळालेले नाही.

    इशांत शर्माने टीम इंडियासाठी (Team India) अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळला होता. अखेरची आयपीएल (IPL 2021 ) मे 2021मध्ये खेळीली होती. मात्र आता संघातील स्पर्धेमुळे इशांत शर्माचे संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे. खराब फॉर्म आणि फिटनेसच्या कारणामुळं इशांत शर्माला टीम इंडियाने बेंचवर बसवले आहे.

    आयपीएल २०२२ (ipl २०२२) च्या मेगा ऑक्शनदरम्यान इशांतला कोणीच संघात स्थान दिल नाही. त्यामुळे आता इशांतसाठी टीम इंडियाचे दरवजे बंद झाले आहेत.इशांत शर्माच्या कारकिर्दीची उलटी गिनती आधीच ऑगस्ट 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर सुरू झाली होती. जेव्हा त्याने 3 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 विकेट घेतल्या होत्या. इशांतने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ९३ सामने खेळले आहेत. यामध्ये ७२ विकेट्स घेतल्या आहे. १२ धावांवर ५ विकेट हे त्याचे बेस्ट गोलंदाजीचे प्रदर्शन आहे.