पाकिस्तानच्या खेळाडूला मागे टाकत टी २०च्या  अव्वलस्थानी राज्य  करणार “हा” भारतीय खेळाडू

    पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार असणारा बाबर आझम (Babar Azam) हा सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. अनेक सामन्यात त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तो सध्या आंतरराष्ट्रीय टी२० रॅकींगच्या अव्वल स्थानी राज्य करत आहे. मात्र आता याचे अव्वल स्थान धोक्यात आले असून लवकरच हा सूर्यकुमार यादव हा भारतीय खेळाडू आता टी२० रॅकींग अव्वलस्थान पटकावणार आहे.

    वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या झंझावाती कामगिरीचा टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) फायदा झाला आहे. आयसीसी टी-२० क्रमवारीत त्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. टॉप-१० मध्ये तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्री टी२० मध्ये भारताचा सर्वोत्तम फलंदाज होण्यासाठी अवघे ५०६ दिवस लागले. त्याने केवळ २२ सामन्यांमध्ये ३८. ११ च्या सरासरीने आणि १७५. ६० च्या स्ट्राइक रेटने ६४८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.

    सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) गेल्या अनेक महिन्यापासून फॉर्ममध्ये आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट फलंदाजी करून टीम इंडियाला विजय प्राप्त करून दिला आहे. त्याच्या याच कामगिरीचे फळ त्याला मिळाले असून तो सध्या आयसीसी टी २० क्रमवारीत नंबर २ चे स्टेषन पटकावले आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये तो पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकून टी२० मध्ये नंबर एकचा फलंदाज बनू शकतो. मात्र यासाठी त्याला वेस्ट विंडीजविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.