Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

भारतीय लेगस्पिनर राहुल चहरने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. लग्नाच्या ४ वर्षांनंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे तो पत्नीपासून वेगळा झाला असून त्याने ही एक नवीन सुरुवात असल्याचे म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 20, 2026 | 09:44 PM
T20 World Cup 2026 च्या मध्ये 'या' भारतीय खेळाडूचा संसार मोडला (Photo Credit- X)

T20 World Cup 2026 च्या मध्ये 'या' भारतीय खेळाडूचा संसार मोडला (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला
  • मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त
  • म्हणाला…
Rahul Chahar Divorce News: एककीकडे भारत आणि श्रीलंका येथे टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार सुरू असताना, भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा युवा लेगस्पिनर राहुल चहर (Rahul Chahar) याचे लग्न अवघ्या चार वर्षांतच संपुष्टात आले आहे. शुक्रवारी, २० फेब्रुवारी रोजी राहुलने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपल्या घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली.

“लहान वयातील निर्णय आणि जीवनाचे धडे”

राहुल चहरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अत्यंत भावूक संदेश लिहिला आहे. त्याने म्हटले की, त्याचे लग्न खूप कमी वयात झाले होते. त्या वेळी त्याला स्वतःच्या क्षमता किंवा भविष्यातील निवडींबद्दल पुरेशी समज नव्हती. “गेल्या काही वर्षांनी मला असे धडे दिले आहेत, ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. गेल्या १५ महिन्यांचा काळ हा माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. हा वेळ न्यायालयीन प्रक्रिया, संयम राखणे आणि सत्याची ताकद ओळखण्यात गेला,” असे राहुलने नमूद केले.

Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ॲडम झाम्पासमोर ओमान संघाने टाकली नांगी! ऑस्ट्रेलियासमोर १०५ धावांचे लक्ष्य 

कायदेशीर प्रक्रियेनंतर अधिकृत घटस्फोट

राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये कायदेशीर कारवाई पूर्ण झाली असून ते आता अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. या प्रक्रियेबद्दल बोलताना राहुल म्हणाला, “आज माझ्या आयुष्यातील हा भाग अधिकृतपणे संपला आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली, पण आता या प्रकरणावर पूर्णविराम मिळाला आहे.” विशेष म्हणजे, राहुलने या नात्याबद्दल कोणतीही कटुता किंवा राग व्यक्त न करता, एका नवीन सकारात्मक दृष्टिकोनासह आयुष्याची नवीन सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

“हा शेवट नाही, तर नवी सुरुवात”

घटस्फोटाच्या या दुर्दैवी घटनेला राहुलने ‘अंत’ न म्हणता ‘सुरुवात’ म्हटले आहे. तो लिहितो, “काही नाती कायम टिकण्यासाठी नसतात; ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी येतात. मी आता पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झालो आहे. यापुढे मी जे काही करेन, ते स्वाभिमान, शांती आणि योग्य निर्णयांच्या आधारावर असेल.” त्याच्यात कोणतीही कटुता नसून, केवळ पुन्हा उभे राहण्याचे धाडस असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

राहुल चहरची क्रिकेट कारकीर्द

राहुल चहरचा जन्म १९९९ मध्ये राजस्थानमधील भरतपूर येथे झाला. याचा अर्थ तो सध्या २६ वर्षांचा आहे. राहुलने भारतासाठी एक वनडे खेळला आहे, ज्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि या सामन्यांमध्ये त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, टी-२० मध्ये त्याने आतापर्यंत १४० सामन्यांमध्ये १४२ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमधील चमकदार कामगिरी

राहुल चहरने आयपीएलमध्ये आपल्या फिरकीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या बलाढ्य संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या तो टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असतानाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या निर्णयामुळे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

NZ vs PAK, T20 World Cup : पाक आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार पहिला सुपर 8 सामना! खेळपट्टीसह हवामान कसे असेल? वाचा सविस्तर 

Web Title: This indian players life broke during the t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • cricket news
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs PAK ‘नो-हॅन्डशेक’ पॉलिसी केवळ दिखावा? दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा; बंद खोलीतील सत्य आले समोर
1

IND vs PAK ‘नो-हॅन्डशेक’ पॉलिसी केवळ दिखावा? दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा; बंद खोलीतील सत्य आले समोर

T20 World Cup Most Wickets : वरुण चक्रवर्तीची शानदार एन्ट्री, टॉप-2 मध्ये स्थान; पाकिस्तानी गोलंदाजाला टाकले मागे
2

T20 World Cup Most Wickets : वरुण चक्रवर्तीची शानदार एन्ट्री, टॉप-2 मध्ये स्थान; पाकिस्तानी गोलंदाजाला टाकले मागे

Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली ‘झिरो’ची हॅट्ट्रिक, नकोसा विक्रम नावावर
3

Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली ‘झिरो’ची हॅट्ट्रिक, नकोसा विक्रम नावावर

T20 World Cup 2026: सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले! दुखापतीमुळे ‘मॅच विनर’ गोलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर
4

T20 World Cup 2026: सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले! दुखापतीमुळे ‘मॅच विनर’ गोलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.