राजस्थानच्या मजबूत फलंदाजीसमोर टिकण्यासाठी ‘ही’ आहे दिल्लीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्सचा सामना करेल तेव्हा त्यांच्यावर मागील सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान असेल.

  नवी दिल्ली : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्सचा सामना करेल तेव्हा त्यांच्यावर मागील सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान असेल.

  संघ ज्या पद्धतीने कोरोनाच्या परिस्थितीतून जात आहे, त्यातून बाहेर पडत त्यांनी पंजाबचा पराभव केला. सलामीवीर पृथ्वी शॉबद्दल बोलायचे तर ट्रेंट बोल्टसमोर त्याची सरासरी चांगली नाही, त्यामुळे त्याला आजचे आव्हान पार करावे लागेल. वॉर्नर मोठ्या लयीत दिसत आहे, त्यामुळे संघाला त्याच्याकडून आणखी एका धडाकेबाज खेळीची अपेक्षा असेल. दिल्लीच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर राजस्थानच्या फलंदाजीसमोर मोठे आव्हान असेल. कुलदीप यादव सातत्याने विकेट घेत आहे. या सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

  दिल्ली टीमकडे सलामीची जोडी पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने सर्वोत्तम जोडी आहे, पण शॉ बोल्टसमोर तितकेसा यशस्वी ठरलेला नाही. अशा स्थितीत ते बोल्ट कसा तोडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संघासाठी विशेष बाब म्हणजे वॉर्नर सातत्याने चांगल्या फॉर्ममध्ये असून तो धावा करत आहे.

  दिल्लीची मिडल ऑर्डर- दिल्लीची सर्वात मोठी चिंता ही त्याची मिडल ऑर्डर आहे. संघाकडे ऋषभ पंत, रोवमन पॉवेल, सरफराज खान आणि ललित यादव यांच्या रूपात पर्याय आहेत पण ते त्यांच्या क्षमतेनुसार खेळत नाहीत. पंतने ६ सामने खेळले आहेत पण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकलेले नाही. अशा स्थितीत राजस्थानच्या भक्कम फलंदाजीसमोर संघाच्या मधल्या फळीला रंगत येण्याची गरज आहे.

  दिल्लीची गोलंदाजी – संघाकडे खलील अहमद, शार्दुल ठाकूर आणि मुस्तफिजुर रहमान यांच्या रूपाने वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.आनरिक नोकियाबद्दल अजूनही शंका आहे. फिरकी गोलंदाजीमध्ये, संघाकडे कुलदीप यादव आहे जो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि १३ विकेट्ससह पर्पल कॅपमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय अक्षर पटेलनेही गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे.

  दिल्लीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

  पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, खलील अहमद.