
मुंबई : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आज खेळला जात आहे. ढाका येथील मैदानावर हा सामना होत असून दोन्ही संघांमध्ये जिंकण्याची चुरस पहायला मिळत आहे. अशातच मैदानावर कॅच पकडताना एका खेळाडूंसोबत मोठा अपघात घडला. कॅच पकडताना तोल गेल्यामुळे बांग्लादेशचा खेळाडू रक्तबंबाळ झाला.
सध्या सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 227 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाची फलंदाजी सुरू आहे. भारताच्या धावसंख्येने चार विकेट गमावून 150 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरच्या आक्रमक फलंदाजीमुळे 49 षटकांनंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 160 आहे.
बांगलादेशचा खेळाडू मेहदीला कॅच पकडण्याची संधी होती पण चेंडूला वेग जास्त होता, त्यामुळे मेहदीला तो नीट पकडता आला नाही आणि नंतर टोपी सावरण्याच्या नादात तो तोंडावर पडला. सर्व खेळाडू त्याला पाहण्यासाठी पोहोचले आणि त्याच्या चेहऱ्यातून रक्त येत असल्याने तातडीने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. तोंडातून रक्त जास्त येत होते, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले.