वॉशिंग्टन सुंदर ऐवजी “हा” खेळाडू झिम्बाब्वे मालिकेत खेळणार

    १८ ऑगस्टपासून भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe)तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र क्रिकेट मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघाला (Indian Team) वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीमुळे मोठा झटका मिळाला होता. मात्र आता बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी एका नव्या खेळाडूला संधी दिली आहे.

    झिम्बाबवे मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) भारतीय संघात निवड झाली होती, मात्र इंग्लंडमधील काऊंटी सामन्यादरम्यान सुंदरच्या खांद्याला दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर गेला आहे. बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदचा Shahbaz Ahmed) संघात समावेश करण्यात आला आहे. शाहबाज अहमद हा भारतीय खेळाडू असून तो आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंज संघात खेळतो. शाहबाज हा अष्टपैलू खेळाडू आहे.

    झिम्बाब्वे दौऱ्यासाठी प्रथम शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवण्यात आले, पण नंतर केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला. मग त्याच्याकडे कर्णधारपदही सोपवण्यात आले. रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल हे खेळाडू या दौऱ्यावर गेलेले नाहीत.