टिम डेव्हिडनं ठोकला ११० मीटर लांब षटकार; पहा व्हिडियो

    ऑस्ट्रेकलिया (Asutralia) संघ आपल्या मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध (West Indies)टी-२० मालिका खेळात आहे. यात ऑस्ट्रेलिया संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना द गाबा येथे खेळल्या गेला असून दुसऱ्या टी-२० सामन्यातही वेस्ट इंडीजचा ३१ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेवर नाव कोरलं. या सामन्यादरम्यान सर्वात आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला तो म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज टीम डेव्हिडनं ११० मीटर लांब मारलेला षटकार.

    वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेकलिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज टीम डेव्हिडनं (Tim David) संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानं अवघ्या २० चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. त्‍यानं त्‍याच्‍या इनिंगमध्‍ये ११० मीटर लांब षटकारही मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल प्रचंड होतोय. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या डावातील 17 व्या षटकात त्यानं ओबेड मॅकॉयच्या चेंडूवर 110 मीटर लांब षटकार ठोकला.