आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये होणार झुंज, दोन्ही कर्णधारांची प्ले ऑफवर नजर

पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC Vs RR)  यांच्यात होईल. दिल्लीचे सध्या 9 सामन्यांत 14 गुण आहेत. म्हणजेच या सामन्यातील विजयासह दिल्ली प्ले-ऑफमध्ये स्थान पक्के करणारा पहिला संघ बनू शकतो. जर राजस्थान संघाला विजय मिळाला तर तो टॉप -4 मध्ये पोहोचेल. राजस्थानचे सध्या 8 सामन्यांत 8 गुण आहेत.

    इंडियन प्रीमियर लीग (IPL-2021) च्या दुसऱ्या सत्रात पहिला डबल हेडर (Double Header Match) सामना खेळवला जाणार आहे. म्हणजेच एका दिवसात दोन (Two Matches In One Day) सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC Vs RR)  यांच्यात होईल. दिल्लीचे सध्या 9 सामन्यांत 14 गुण आहेत. म्हणजेच या सामन्यातील विजयासह दिल्ली प्ले-ऑफमध्ये स्थान पक्के करणारा पहिला संघ बनू शकतो. जर राजस्थान संघाला विजय मिळाला तर तो टॉप -4 मध्ये पोहोचेल. राजस्थानचे सध्या 8 सामन्यांत 8 गुण आहेत.

    दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात राजस्थानने पंजाब किंग्जविरुद्ध रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवला. 20 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात 4 धावांचा बचाव करत राजस्थानला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची उणीव भासू दिली नाही. आर्चर व्यतिरिक्त, बेन स्टोक्स आणि जोस बटलर देखील फेज 2 साठी उपस्थित नाहीत, परंतु अद्याप युवा खेळाडूंच्या आधारावर प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची शक्ती संघाकडे आहे.

    दोन्ही संघ त्यांच्या विजयी संयोजनात छेडछाड करण्याची शक्यता फारच कमी आहे. तथापि, मार्कस स्टोइनिसच्या दुखापतीमुळे दिल्लीला बदल करण्यास भाग पाडले जाऊ शकते. शेवटच्या सामन्यात स्टोइनिसच्या पायाल गंभीर दुखापत झाली होती. जर स्टोइनिस फिट नसेल तर स्टीव्ह स्मिथला प्लेइंग -11 मध्ये त्याच्या जागी समाविष्ट केले जाऊ शकते.